Spiritual: बुधवारच्या दिवशी करा हे सात उपाय, मिळेल अपार धन आणि समृद्धी!

श्री गणेश आपल्या भक्तांच्या जीवनात कधीही संपत्तीची कमतरता भासू देत नाही आणि त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करतो. चला तर मग जाणून घेऊया गणपतीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय.

Spiritual: बुधवारच्या दिवशी करा हे सात उपाय, मिळेल अपार धन आणि समृद्धी!
श्री गणेश
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 03, 2022 | 2:37 PM

हिंदू धर्मात आठवड्यातील सातही दिवसांना विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवस देव किंवा देवीला समर्पित आहे. त्याचप्रमाणे बुधवारचा दिवस (Wednesday worship)  देखील गणपतीला (Ganesh puja) समर्पित आहे आणि असे मानले जाते की, गणपती प्रसन्न झाल्यास ते आपल्या भक्तांवर  विशेष कृपा करतात. श्री गणेश आपल्या भक्तांच्या जीवनात कधीही संपत्तीची कमतरता भासू देत नाही आणि त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करतो. चला तर मग जाणून घेऊया गणपतीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय.

गणपतीला प्रसन्न करण्याचे 7 सोपे उपाय

  1.  श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी व्रत करू शकता. उपवास करताना पहाटे लवकर उठून आंघोळ करून घरी किंवा मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी.
  2.  श्रीगणेशाची पूजा करताना त्याला हिरवी दूर्वा अर्पण करावी. गणेशाच्या पूजेसाठी दुर्वा अत्यंत शुभ मानली जाते.
  3.  श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर बुधवारी गणेश चालिसाचे पठण करा. गणेश चालिसाचे पठण केल्यावरच तुमच्या पूर्णत्वाचा विचार होईल.
  4. बुधवारी गणपती बाप्पाला मुगाची डाळ अर्पण करा आणि नंतर प्रसाद वाटप करा. त्यानंतर संध्याकाळी तोच नैवेद्य खाऊन उपवास सोडा.
  5. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. असे करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
  6. गणपतीला शेंदूर आवडतो, त्यामुळे पूजेच्या वेळी शेंदूर वापरा. श्रीगणेशाला शेंदूर अर्पण केल्यानंतर कपाळावर त्याचा  तिलक लावा.
  7. सलग 7 बुधवारी गणेश मंदिरात जा आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना गूळ अर्पण करा. हा उपाय केल्याने श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)