Surya Grahan 2026 : सूर्य ग्रहणाच्या काही तासांआधी सूतककाळ सुरु, भारतात पाळावा लागणार का ? वेळ काय ?

साल २०२६ चे पहिले सुर्यग्रहण मंगळवारी लागणार आहे. कोणत्याही सुर्यग्रहणाचे हिंदूच्या चालीरितीमध्ये आणि धार्मिक मान्यते मोठे महत्व असते. विज्ञानानुसार ही सर्वसामान्य खगोलीय घटना आहे. मात्र, धार्मिक आणि संशोधक दोन्ही लोक अशा घटनांना निरनिराळ्या कारणांनी महत्व देत असतात...

Surya Grahan 2026 : सूर्य ग्रहणाच्या काही तासांआधी सूतककाळ सुरु, भारतात पाळावा लागणार का ? वेळ काय ?
Surya Grahan 2026
| Updated on: Feb 15, 2026 | 10:27 PM

साल २०२६ चे पहिले सुर्यग्रहण लागणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी कुंभ रास आणि धनिष्ठा नक्षत्रात सुर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सुर्यग्रहण असणार आहे. सुर्यग्रहणाच्या दरम्यान सुर्याचा आकार कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की भारतात हे ग्रहण दिसेल की नाही ? याचा सुतककाळ लागू होतोय की नाही ? या संदर्भात लोक कन्फ्युज आहेत. चला तर जाणून घेऊयात…

किती वाजता लागणार सुर्यग्रहण ?

भारतीय वेळेनुसार सुर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारी ३.२६ वाजता सुरु होऊन ते सायंकाळी ७.५७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या सुर्यग्रहणाचा एकून कालावधी ४ तास ३१ मिनिटांचा असणार आहे. हे सुर्यग्रहण सायंकाळी ५.१३ वा. ते सायंकाळी ६.११ वाजता त्याच्या परमोच्च क्षणावर असणार आहे.

भारतातून दिसणार का ?

हे कंकणाकृती सुर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही. हे सुर्यग्रहण झिम्बाबे, जाम्बिया, तंजानिया, नामिबिया, मॉरीशस,बोत्सवाना, मोझाम्बिक, अर्जेंटीना आणि चिली सह दक्षिण आफ्रीका, अंटार्टीका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात पाहता येऊ शकणार आहे.

सुर्यग्रहणाचा सूतककाळ पाळले योग्य ?

सुर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. परंतू १७ फेब्रुवारीचे हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.यामुळे याचा सूतक काळ देखील मान्य असणार नाही.

सुर्यग्रहणाच्या वेळी या चूका टाळा –

धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणकाळात पूजाअर्चा करणे वर्ज्य आहे. या काळात देवी-देवतांच्या प्रतिमांना स्पर्श करु नये. तसेच कोणतेही शुभ वा मंगल कार्य करु नये. ग्रहण काळात अन्न देखील शिजवू नये. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

सुर्यग्रहणानंतर काय करावे ? –

सुर्यग्रहणानंतर अंघोळ जरुर करावी. त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे.घराच्या देव्हाऱ्याच्या मुर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पुन्हा त्यांची स्थापना करावी. आणि ग्रहणानंतर दानधर्म करणे पुण्याचे काम असल्याने त्याचे विशेष लाभ मिळतात.

ग्रहणाशी जुळलेल्या धार्मिक समजूती –

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सुर्य आणि चंद्र ग्रहणाचा संबंध राहू आणि केतूशी मानला जात आहे. ज्यांना पाप वा छाया ग्रह देखील मानले जाते. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देवता आणि राक्षसांत वाद झाला. तेव्हा विष्णूंनी मोहिनीचे रुप धारुन करुन अमृत देवतांना वाटणे सुरु केले. त्यावेळी स्वर्भानु नावाच्या राक्षसाला हे कळले आणि तो गपचूप देवतांच्या पंगतीत जाऊन बसला.

विष्णूंनी त्याना चुकून अमृत पाजले. सुर्य आणि चंद्र देवाने त्याला ओळखून विष्णूंकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर विष्णूंनी त्या असुराचे सुदर्शन चक्र सोडून दोन तुकडे केले. अमृत प्यायल्याने या राक्षसाचा मृत्यू झाला नाही. त्याचे दोन तुकडे दोन दिशांना गेले. त्यांना राहु आणि केतू म्हटले जाते. हे दोघे वेळोवेळी सुर्य आणि चंद्राला गिळतात त्या घटनेला ग्रहण असे म्हटले जाते.