
Astro Tips : ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण आपण अनेकवेळा ऐकली असेल. तीन लोकं एखाद काम करतात तेव्हा ते हमखास बिघडतं असं म्हणतात. त्यामुळे अशावेळी ही म्हण हमखास म्हटली जाते. पण हे खरोखरं का म्हणटलं जातं, त्यामागे खरंच काही कारण आहे का ? घरातली वडीलृधारी मंडळी सुद्धा बऱ्याचदा असं म्हणतात की शुभ कामासाठी तीन लोकांना कधीच एकत्र पाठवू नये. या सगळ्यामागे नेमकं काय कारण आहे ?
तीन हा आकडा अशुभ आहे का? ही श्रद्धा प्राचीन काळापासून आहे, पण त्यामागील कारण काय ? चला जाणून घेऊया.
अशुभ असतो का 3 आकडा ?
बऱ्याच प्रकरणांमध्ये ३ हा आकडा अशुभ मानला जातो. जेवण वाढताना, कोणाच्याही प्लेटमध्ये तीन पोळ्या वाढल्या जात नाहीत.धार्मिक समारंभात, पूजा वगैरे करताना तीन लोक एकत्र बसणे निषिद्ध मानले जाते. मुलगा किंवा मुलीसाठी स्थळ पहायला जाताना देखील तीन लोकांनी जाणं टाळतात. याच कारणांमुळे लोक 3 हा आकडा अशुभ आहे, असं मानतात.
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ का म्हणतात असं ?
जर तीन लोक मिळून काहीतरी करत असतील किंवा करणार असतील तर त्यांच्यात वाद होण्याची शक्यता असते. असे म्हणतात की दोन लोकांमध्ये सर्वोत्तम समन्वय असतो.पण तीन लोक एकत्र आल्यावर ते बोलू लागले तर एकाग्रता बिघडू शकते. म्हणूनच, तीन लोकांनी मिळून कोणतेही काम करू नये असा सल्ला दिला जातो.
तथापि, हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, 3 हा आकडा अशुभ नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर, ही संख्या अत्यंत शक्तिशाली मानली जाते. असे मानले जाते की 3 ही संख्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्रिमूर्ती आणि तीन वेदांचे प्रतिनिधित्व करते. शिवाचे त्रिशूल देखील तीन भागात विभागलेले आहे. लोकं फक्त सामान्य कारणांमुळे, समजांमुळे 3 अंक अशुभ मानतात, बाकी काही नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)