भारतातलं चमत्कारिक मंदीर, मूर्तीतून चक्क निघते रक्त!

भारतात एक खास मंदीर आहे. या मंदिरातील मूर्तीतून रक्त निघते असे सांगितले जाते. तसेच हे जागृत देवस्थान असून त्याबाबत अनेक आख्यायिका आहेत.

भारतातलं चमत्कारिक मंदीर, मूर्तीतून चक्क निघते रक्त!
telangana narasimha temple
| Updated on: Jul 30, 2025 | 6:04 PM

Telangana narasimha temple : भारतात अशी काही मंदिरं आहेत, जी शेकडो, हजारो वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. यातील काही मंदिरं तर जागृत देवस्थान असल्याचं बोललं जातं. या मंदिरांत जाऊन मनातली इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते असेही सांगितले जाते. मात्र भारतात असे एक मंदीर आहे जिथे देवाचं वास्तव्य असल्याचं बोललं जातं. मूर्तीला थोडं दाबलं की त्यातून लाल रक्त येतं असं म्हटलं जातं.

तेलंगनातील जागृत देवस्थान

मिळालेल्या माहितीनुसार हे मंदीर तेलंगाना राज्यातील वारंगल जिल्ह्यातील मल्लूर या गावात आहे. हे मंदीर म्हणजे जागृत देवस्थान असल्याचे म्हटले जाते. हे नरसिंहाचे मंदीर आहे. या मंदिरातील मूर्ती ही मानवी त्वचेप्रमाणे असल्याचे म्हटले जाते. या मूर्तीवर थोडाजरी दाब दिला तर त्यातून रक्त निघते असाही दावा केला जातो. या मंदिराचे नाव हेमाचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदीर असे आहे. या मंदिरात भगवान नरसिंह आजदेखील जीवित स्वरुपात आहेत, अशी भाविकांची भावना आहे.

नाभीतून निघतो लाल द्रव पदार्थ

हे मंदीर समुद्रसपाटीपासून साधारण 1500 फूट उंच आहे. पुट्टकोंडा नावाच्या डोंगावर हे मंदीर आहे. या डोंगरावर नरसिंह स्वामी यांची मूर्त प्रकटली अशी अख्यायिका आहे. या मंदिरात असलेली मूर्ती ही एखाद्या धातूपासून किंवा दगडापासून तयार करण्यात आलेली नाही. या मूर्तीचे शरीर मानवी त्वचाप्रमाणे भासते. या मूर्तीवर फूल ठेवताच ते दबून मूर्तीच्या आत जाते असे म्हटले जाते. तसेच मूर्तीवर जास्त दाब दिल्यास तिच्यातून रक्तासारखा लाल द्रव पदार्थ निघतो, असा दावा केला जातो. हा द्रव पदार्थ मूर्तीच्या नाभीतून सतत निघतो. त्याला थांबवण्यासाठी पूजारी नाभीवर चंदनाचा लेप लावतात, असे म्हटले जाते.

हे मंदीर सकाळी 8.30 वाजता खुले होते. ते दुपारी 1 वाजता बंद केले जाते. नंतर पुन्हा हे मंदीर 2.30 वाजता उघडले जाते. नंतर संध्याकाळी साडे पाच वाजता या मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.