Secret keeper| स्त्रियांच्या पोटात गुपितं राहत नसल्याचं का म्हणतात, याचा उत्तर आहे महाभारतात, जाणून घ्या

18 दिवस चाललेल्या महाभारतात खूप विषेश घटना घडल्या. आजचे आयुष्य जगत असताना त्या घटना आपल्याला बोध देतात. पण या युद्धाच्या शेवटी युधिष्ठिराने आपली आई कुंतीला शापही दिला होता.

Secret keeper| स्त्रियांच्या पोटात गुपितं राहत नसल्याचं का म्हणतात, याचा उत्तर आहे महाभारतात, जाणून घ्या
mahabharat
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 1:43 PM

मुंबई : महाभारत आणि हिंदू पुराण एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. महाभारताची कथा तुम्ही ऐकल्या वाचल्या असतीलच. पांडव आणि कौरवांमध्ये धर्मआणि अधर्म यावरून झालेल्या या युद्धाचा परिणाम आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळतो. या युद्धात पांडवांचा विजय झाला असला तरी युद्धानंतर त्यांचे जग बदलले होते. धनुर्धर अर्जुनासह अनेक योद्ध्यांनी या युद्धात कपटाचा अवलंब केला. 18 दिवस चाललेल्या महाभारतात खूप विषेश घटना घडल्या. आजचे आयुष्य जगत असताना त्या घटना आपल्याला बोध देतात. पण या युद्धाच्या शेवटी युधिष्ठिराने आपली आई कुंतीला शापही दिला होता.

पांडवांचा मुक्काम गंगेच्या तीरावर
महाभारताच्या युद्धानंतर सर्व मृत नातेवाईक व नातेवाईकांना यज्ञ करून पांडव एक महिना गंगेच्या काठावर राहिले . धर्मराज युधिष्ठिराचे सांत्वन करण्यासाठी अनेक महान ऋषी-मुनी येत होते. दरम्यान, ऋषी नारद देखील युधिष्ठिराकडे गेले आणि त्यांनी युधिष्ठिराच्या मनाचीस्थिती विचारली. नारदांनी युधिष्ठिराला प्रश्न केला आणि म्हणाले की “हे युधिष्ठिरा, तुझ्या बाहूंच्या बळावर आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तू ही लढाई जिंकली आहेस. पापी दुर्योधनाचा पराभव केल्यावर तू सुखी नाहीस का?

आणि या घटनेनंतर युधिष्ठिराने त्यांच्या आईला श्राप दिला

यावर युधिष्ठिराने उत्तर दिले की “खरेतर मी हे युद्ध कृष्णाच्या कृपेने, ब्राह्मणांच्या आशीर्वादाने आणि भीम आणि अर्जुनाच्या सामर्थ्याने जिंकले आहे. तरीही माझ्या हृदयात एक खोल दुःख आहे. मी माझ्याच लोभामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने माझेच नातलग मारले. पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूवर द्रौपदीचा शोक पाहून मी विजयाचा पराभव मानतो. कर्ण माझा भाऊ होता हे जाणून घ्या. सूर्यदेव आणि माझी आई कुंती यांच्या मिलनातून त्यांचा जन्म झाला.तो माझ्या आईचा मोठा मुलगा होता. मी त्याला नकळत मारले. ही गोष्ट मला आतून खात आहे. आमच्या पैकी कोणालाही कर्ण माझा भाऊ होता ही गोष्ट माहित नव्हती. माझ्याकडे अर्जुन आणि कर्ण दोघे असते तर मी जग जिंकू शकलो असतो.

हे बोलून युधिष्ठिर भावूक झाला आणि त्याचे अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्याची आई कुंती पुढे आली आणि युधिष्ठिराला म्हणाली असे दु:ख करू नकोस. त्यावर युधिष्ठिराने रागाने त्याने आई कुंतीसह संपूर्ण स्त्री जातीला श्राप दिला आणि म्हणाला आज मी संपूर्ण स्त्री जातीला शाप देतो की ते आपल्या हृदयात काहीही लपवून ठेवू शकणार नाहीत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Rudraksha | खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीय ? मग तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करा

Vastu tips | सावधान, सकाळी उठल्याबरोबर या 5 गोष्टी पाहूच नका, दिवस खराब गेलाच म्हणून समजा

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 प्रकारच्या लोकांपासून लांबच राहा, नाहीतर नुकसान अटळ