Gupt Navratri 2022 | आज पासून आईचा जागर , गुप्त नवरात्रीला सुरुवात, पण चुकूनही ही कामे करु नका

| Updated on: Feb 02, 2022 | 3:13 PM

 माघ (Magh) गुप्त नवरात्री 2022: हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार नवरात्री (Navratra 2022) वर्षातून चार वेळा येते. या चार नवरात्रींचेही स्वतःचे वेगळे महत्त्व आहे.

Gupt Navratri 2022 | आज पासून आईचा जागर , गुप्त नवरात्रीला सुरुवात, पण चुकूनही ही कामे करु नका
Gupta Navratra
Follow us on

मुंबई : माघ (Magh) गुप्त नवरात्री 2022 हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार नवरात्री (Navratra 2022) वर्षातून चार वेळा येते. या चार नवरात्रींचेही स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. त्यापैकी दोन थेट नवरात्री चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्र आहेत, जे आपण सर्व मोठ्या थाटामाटात साजरे करतो, पण याशिवाय आणखी दोन नवरात्री आहेत, ज्यांना गुप्त नवरात्री 2022 म्हणतात. गुप्त नवरात्री म्हणतात. या वर्षी माघ महिन्यात येणारी गुप्त नवरात्र 2 फेब्रुवारी 2022 पासून आहे, जी 11 फेब्रुवारी रोजी संपेल. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो. असे म्हणतात की. या कालावधीत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात (Gupt Navratri 2022 special do not do theses thing in gupt navratri).गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्या पाळल्या जातात. या दिवसात आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायाला हवी याबद्द्ल माहिती जाणून घेणार आहोत.

देवी दुर्गेची नऊ रूपे
माँ दुर्गेची नऊ रूपे असून त्यापैकी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री माता. देवीच्या या नऊ रूपांची चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीमध्ये पूजा केली जाते, तर गुप्त नवरात्रीमध्ये ज्या दहा महाविद्या देवींची पूजा केली जाते ती म्हणजे तारा, त्रिपुरा सुंदरी, भुनेश्वरी, छिन्नमस्ता, काली, त्रिपुरा भैरवी, धुमावती, बगलामुखी.

शक्तीची साधना कशी करावी?
? गुप्त नवरात्रीच्या वेळी शक्तीची साधना करण्यासाठी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करुन ध्यान केल्यानेतर शुद्ध अंतःकरणाने देवीच्या उपासनेचा संकल्प घ्या.

? देवीची सर्व पूजा सामग्री घ्या आणि विधीवत कलश स्थापित करा आणि मातीच्या भांड्यात जवची पेरणी करा.

? दररोज शुद्ध पाण्याने सिंचन करा.

? गुप्त नवरात्रीच्या नऊ दिवस प्रामाणिक अंतःकरणाने साधना केल्याने अष्टमी किंवा नवमीला नऊ कन्या पूजा करा आणि त्यांना हलवा-पूरीचं नैवेद्य द्या.

? यानंतर गुप्त नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीला विधीवत पूजा करुन निरोप द्या.

गुप्त नवरात्री दरम्यान करा ‘ही’ कामे :
– गुप्त नवरात्रीत देवी लक्ष्मीची पूजा करताना, तिला कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे. आपल्याकडे कमळाचे फूल नसल्यास, आपण कमळाच्या फुलाचे चित्र देखील ठेवू शकता.

– जर तुम्ही गुप्त नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरी आणले, तर देवी लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. हे नाणे आपल्या घरात संपत्ती, आनंद आणि समृद्धी आणते.

वर्षात चार वेळा नवरात्र सण साजरा केला जातो
नवरात्रीचे नऊ दिवस शक्तीच्या साधनेसाठी खूप महत्वाचे मानले जातात. देवीला समर्पित नवरात्र वर्षातून चार वेळा येते.

1. चैत्र नवरात्र किंवा बासंतीय नवरात्र

2. आषाढी किंवा वर्षाकालीन नवरात्र

3. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र

4. माघ नवरात्र किंवा शिशिर नवरात्र

प्रत्येक ऋतूमध्ये नवरात्रात नऊ दिवस शक्तीची उपासना केली जाते. हे चारही नवरात्र दोन वर्गात विभागले गेले आहेत. त्यापैकी चैत्र आणि अश्विन नवरात्र प्रकट नवरात्र आहेत, तर आषाढ आणि माघ नवरात्रीला गुप्त नवरात्र असे म्हणतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात मोठी संकटे टाळता येतील !

‘धर्मनाथ बिज’ म्हणजे काय आहे, जाणून घ्या तीचे महत्त्व

02 February 2022 Panchang | 2 फेब्रुवारी 2022, बुधवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ