पौष महिना कधी सुरू होतो? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

हिंदू मान्यतेनुसार, या महिन्यात सूर्यदेवाची पूजा केल्याने धन आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. या वर्षी पौष महिना कधी सुरू होईल ते जाणून घेऊयात.

पौष महिना कधी सुरू होतो? या महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
paush-months
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Nov 27, 2025 | 7:05 PM

हिंदु कालेंडरनुसार मार्गशीर्षानंतर पौष महिना येतो. हा हिंदू वर्षाचा 10 वा महिना असून धार्मिक दृष्टिकोनातून पौष महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना सूर्य देवाची पूजा करण्यासाठी पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी तसेच दान करण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी विशेष मानला जातो. शिवाय या महिन्यात काही उपाय केल्याने समृद्धी, ज्ञान आणि मोक्ष मिळतो. त्या सोबतच सूर्य देवाचा आशीर्वाद मिळवा यासाठी तुम्ही या महिन्यात कोणते उपाय करू शकता ते जाणून घेऊयात.

या दिवसापासून सुरू होतो पौष महिना

कॅलेंडरनुसार पौष महिना शुक्रवार 5 डिसेंबर 2025 रोजी सुरू होतो. पौष पौर्णिमा 3 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे हा पौष महिना शनिवार 3 जानेवारीपर्यंत चालू राहील.

पौष महिन्याचे महत्त्व

पौष महिना हा सूर्यदेव, भगवान विष्णू आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुभ मानला जातो. या महिन्यात पूजा आणि दान केल्याने धन, समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळते. शिवाय तुम्ही दररोज सूर्यदेवाची प्रार्थना केल्याने करिअरमध्ये प्रगती आणि दीर्घायुष्य मिळते. या महिन्यात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध विधी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते.

सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत

पौष महिन्यात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन आणि लाल फुले मिक्स करा. “ॐ सूर्याय नम:” मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला सुर्यदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. म्हणून पौष महिन्यात तुम्ही दररोज किंवा रविवारी हा विधी करू शकता.

हे काम नक्की करा

सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही पौष महिन्यात दर रविवारी उपवास देखील करू शकता. या उपवासात मीठ सेवन केले जात नाही. या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला लाल फुले, लाल चंदनाची पेस्ट, तांदूळ आणि तीळ अर्पण करू शकता. सूर्यदेवाला तीळ-तांदळाची खिचडी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)