AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळाच्या उदयामुळे ‘5’ राशींच्या लोकांचे उघडतील भाग्याचे दरवाजे

मंगळ मीन राशीत उदय पावला आहे, ज्यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना करिअर, धन आणि भाग्याच्या बाबतीत विशेष लाभ मिळतील. कोणत्या आहेत या राशी ते जाणून घेऊयात.

मंगळाच्या उदयामुळे '5' राशींच्या लोकांचे उघडतील भाग्याचे दरवाजे
mangal
| Edited By: | Updated on: May 02, 2026 | 11:53 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह धैर्य ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानला जाते. मंगळाच्या दीर्घकाळच्या अस्ताच्या स्थितीमुळे अनेक लोकांची कामे थांबली होती आणि उत्साह कमी झाला होता. अशातच 2 मे रोजी मंगळाचा हा काळ संपला असून मंगळ ग्रह मीन राशीत गोचर केला आहे. तर मंगळाचा हा उदय काही राशींसाठी अत्यंत शुभ असेल. त्यांच्या जीवनातील आळस दूर होईल आणि करिअर व आर्थिक बाबतीत नवीन उंची गाठण्याच्या संधी निर्माण होतील. जर तुम्ही या राशींपैकी असाल तर तुमची क्षमता दाखवण्यासाठी सज्ज व्हा. चला तर मग कोणत्या आहेत या राशी ते जाणून घेऊयात.

मिथुन रास

मंगळ हा मिथुन रास असलेल्या लोकांच्या दहाव्या घरात उदय झालेला आहे. जे करिअरच्या वाढीसाठी एक अत्यंत शुभ स्थान मानले जाते. त्याच्या उदयानंतर तुमच्या कामाची ऊर्जा परत येईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ सर्वांना स्पष्टपणे दिसेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धा आता तुमच्या बाजूने असेल. तुम्ही तुमच्या करिअरबाबत काही धाडसी आणि साहसी निर्णय घेऊ शकता, जे भविष्यात खूप उपयुक्त ठरतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांची क्षमता दाखवण्याची भरपूर संधी मिळेल.

उपाय: नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करा आणि अनावश्यक भांडणे टाळा.

कर्क रास

कर्क राशीसाठी मंगळ हा एक अत्यंत शुभ ग्रह असून तो तुमच्या नवव्या घरात उदय झाला आहे. यामुळे तुमचे भाग्य मोठ्या प्रमाणात मजबूत होईल. तुम्हाला तुमचे वडील आणि शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्हाला प्रवास करण्याची गरज भासू शकते, जो फायदेशीर ठरेल. जे शिक्षण घेत आहेत किंवा प्रेमाच्या नात्यात आहेत, त्यांच्यासाठीही हा काळ खूप सुखद असेल. तुमचा आदर आणि सन्मानही वाढेल.

उपाय: हनुमानाला कुंकू अर्पण करा आणि सदैव विनम्र राहा.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीचा अधिपती ग्रह मंगळ आता पाचव्यास्थानात उदय पावला आहे. यामुळे या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढेल. तसेच बुद्धी आणि विचारशक्ती तीक्ष्ण राहील, ज्यामुळे तुम्ही अत्यंत आव्हानात्मक कामेही सहजपणे हाताळू शकाल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतील आणि चांगले यश मिळवतील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल किंवा कला क्षेत्रात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल.

उपाय: दररोज सकाळी भगवान हनुमानाची पूजा करा आणि सूर्याला पाणी अर्पण करा.

मकर रास

मकर राशीच्या तिसऱ्या घरात मंगळ उदय पावला आहे, ज्यामुळे या राशींच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमचे अगदी छोटे प्रयत्नही आता यशस्वी होतील. जर तुम्ही एखादे नवीन काम किंवा प्रकल्प हाती घेण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम वेळ आहे. तुमच्या भावंडांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील आणि त्यांच्या पाठिंब्याचा तुम्हाला फायदा होईल. छोट्या प्रवासांमुळे नवीन संधी मिळू शकतात. समाजात तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल.

उपाय: आपल्या लहान भावंडांना मदत करा आणि नेहमी जमिनीवर पाय ठेवा.

मीन रास

मंगळ मीन राशीच्या पहिल्या घरात उदय पावला आहे, ज्यामुळे तो तुमच्यासाठी सर्वात प्रभावशाली ठरेल. तसेच या राशीच्या लोकांची ऊर्जा आणि कामाप्रती असलेली आवड सर्वोच्च पातळीवर असेल. तुम्ही आयुष्यातील मोठे निर्णय घेण्यास अजिबात संकोच करणार नाही. नशिबाची साथ असल्यामुळे, आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन ओळख मिळू शकते. तुम्हाला फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून तो तुमच्या यशात अडथळा ठरणार नाही.

उपाय: गरजू लोकांना भोजन द्या आणि आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या.

मंगल उदयावरील सामान्य उपाय

मंगळाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्याचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही खालील सोप्या उपायांचे अवलंब करू शकता:

‘ओम मंगलाय नमः’ या मंत्राचा रोज जप करा.

मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा आणि आराधना करा.

लाल रंगाच्या वस्तू, जसे की मसूर डाळ किंवा लाल कापड दान करा.

आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतीही घाईची कृती करणे टाळा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...