बाथरूममधील या छोटाशा चूका वास्तुदोष निर्माण करू शकतात; या गोष्टी करणे टाळा
घरातील बाथरुम अशी एक जागा आहे जिथून नकारात्मकता जास्त वेगाने पसरू शकते. त्यामुळे बाथरुमच्याबाबतीत अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे टाळले पाहिजे. अन्यथा वास्तूदोष निर्माण होऊ शकतो.

घराचा प्रत्येक भाग वास्तुशी जोडलेला असतो. मग ते स्वयंपाक घर असो, देवघर असो किंवा आरामाची खोली असो सर्वांबद्दलच वास्तूशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहे. हे नियम पाळले तर नक्कीच तुम्हाला आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात. पण वास्तूशास्त्रात बाथरूमबद्दलही काही नियम, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण अनेकदा आपले बाथरूम केवळ सोयीसाठी डिझाइन करतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार, त्याचे योग्य स्थान, रंग आणि सेटअप आपल्या जीवनावर परिणाम करू शकतात. चुकीच्या दिशेने बाथरूम, किंवा आरशाची चुकीची जागा नकारात्मक उर्जेला आमंत्रित करू शकते, ज्यामुळे आरोग्य समस्या, मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
त्यामुळे जर तुम्हाला घरात सकारात्मकता, आरोग्य आणि कल्याण हवे असेल तर बाथरूममधील लहान चुकांकडे दुर्लक्ष करू नये. चला जाणून घेऊयात की वास्तूशास्त्रात बाथरुमच्याबाबतीत टाळावे अशा सात सामान्य चुका कोणत्या. जेणेकरून त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.
बाथरूमची चुकीची जागा
बाथरूमची दिशा खूप महत्वाची आहे. बाथरूम ईशान्य, उत्तर, मध्य आणि नैऋत्य दिशेला ठेवणे टाळा, कारण या दिशा घरातील सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेशी संबंधित आहेत. बाथरूम पश्चिम किंवा वायव्य दिशेने असावे. यामुळे कचरा विल्हेवाट लावणे सोपे होते आणि घरात संतुलित ऊर्जा संतुलन राखले जाते.
गडद रंग टाळा
काळा, गडद निळा किंवा लाल रंग बाथरूमसाठी योग्य नाहीत. हे रंग नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात. त्याऐवजी पांढरा, हलका निळा किंवा पिवळा असे हलके रंग देऊ शकता.त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
आरशाची योग्य जागा
बाथरूमच्या दारासमोर आरसे लावणे टाळा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. बाथरूमच्या आतील भिंतीवर आरसा ठेवला तर चालतो.
बाथरूमचा दरवाजा
बाथरूमचा दरवाजा नेहमी आतील बाजूस उघडणारा असावा. तसेच बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखली जाते. तसेच बाथरूम नेहमी स्वच्छ राहिल याची काळजी घ्या.
पाण्याची गळती
बाथरूममध्ये गळतीमुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही तर आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. नळ बिघडला असेल तर ताबडतोब दुरुस्ती करा आणि प्लंबिंगची नियमित तपासणी करा.
बाथरूममध्ये खूप पसारा नसावा
बाथरूममध्ये जास्त सामान किंवा खराब वायुवीजन यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. मोप्स आणि झाडूसारख्या वस्तू बाथरुमध्ये ठेवू नका. हव तर बाथरुमच्या बाहेर तुम्ही नीट अरेंज करून ठेवू शकता.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही
