AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Remedies | टिळा लावल्याने सौंदर्यच नाही तर सौभाग्यही वाढते, जाणून घ्या टिळा लावण्याचे नियम आणि फायदे

हिंदु धर्मात कपाळावर लावलेला टिळा याला खूप महत्त्व आहे. टिळाचे बरेच प्रकार आहेत. जसे की लांब टिळा, गोल टिळा, तीन आडव्या रेषांचा टिळा इत्यादी. भगवान शिवचे भक्त त्रिपुण्ड टिळा लावतात. तर शक्तीची साधना करणारे गोलाकार ठिपक्यासारखा टिळा लावतात. असे म्हणतात की कोणतीही पूजा कपाळावर टिळा न लावता अपूर्ण मानली जाते.

Tilak Remedies | टिळा लावल्याने सौंदर्यच नाही तर सौभाग्यही वाढते, जाणून घ्या टिळा लावण्याचे नियम आणि फायदे
Tilak Remedies
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 15, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई : हिंदु धर्मात कपाळावर लावलेला टिळा याला खूप महत्त्व आहे. टिळाचे बरेच प्रकार आहेत. जसे की लांब टिळा, गोल टिळा, तीन आडव्या रेषांचा टिळा इत्यादी. भगवान शिवचे भक्त त्रिपुण्ड टिळा लावतात. तर शक्तीची साधना करणारे गोलाकार ठिपक्यासारखा टिळा लावतात. असे म्हणतात की कोणतीही पूजा कपाळावर टिळा न लावता अपूर्ण मानली जाते. म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यावर टिळा लावण्याची परंपरा आहे. टिळाचे महत्त्व काय आहे, जाणून घ्या (Tilak Remedies Know The Benefits And Rules Of Applying Tilak) –

टिळांचे प्रकार

टिळा हे मुळात तीन प्रकारचे असतात. एक रेखाकृती टिळा, दोन-रेखा कृती टिळा आणि त्रिरेखाकृती टिळा. या तीन प्रकारच्या टिळांसाठी चंदन, केशर, गोरोचन आणि कस्तुरी यांचा वापर केला जातो. त्यापैकी कस्तुरीचा टिळा सर्वात महत्वाचा आहे.

राखेचा टिळा

शैव परंपरेशी संबंधित साधू आणि संत बहुतेक वेळा त्यांच्या अंगावर राख लावताना दिसतात. हवनानंतरही हवनची राख टिळा म्हणून लावण्याची परंपरा आपल्याकडे आहे. याने भगवान भैरव प्रसन्न होतात आणि आपली कृपा दर्शवतात.

चंदनाचा टिळा

कपाळावर चंदनचा टिळा लावल्याने आपल्या मनाला शीतलता प्राप्त होते. त्याचा उपयोग केल्याने एकाग्रता वाढते. चंदनाचे बरेच प्रकार आहेत. त्यात लाल चंदनाचा टिळा व्यक्तीमध्ये ऊर्जा संक्रमित करतो. तर पिवळ्या चंदनाचा टिळा किंवा हळदीचा टिळा लावल्याने देवगुरु बृहस्पतींचा आशीर्वाद मिळतो.

कुंकवाचा टिळा

पूजेमध्ये फक्त कुंकवाचा टिळा लावला जातो. हळद पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून कुंकू बनविले जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्य आणि सौभाग्यसाठी कपाळावर कुंकू लावतात.

सिंदूर टिळा

सिंदूरचा टिळा अनेक देवी-देवतांना लावला जातो. सिंदूरच्या टिळा सर्व प्रकारच्या अडथळ्यांना दूर करते असे म्हणतात. हनुमंत आणि गणपतीच्या पूजेत याचा विशेष उपयोग केला जातो. जसे मंगळवार आणि शनिवारी श्री हनुमान यांना टिळा लावून प्रसाद म्हणून हनुमानजींच्या खांद्यावरील सिंदूर टिळा म्हणून लावल्यास जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

Tilak Remedies Know The Benefits And Rules Of Applying Tilak

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Temple Vastu Tips | घरात कुठल्या दिशेला आणि कसे असावे पूजाघर, जाणून घ्या त्याबाबतच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

मनुष्यच नाही तर देवी-देवताही चुका करतात, ती कुठली चूक होती ज्यामुळे यमराजला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...