AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shukra Pradosh Vrat- आज शुक्र प्रदोष व्रत, काय आहे महत्त्व आणि पूजा विधी

आज प्रदोष व्रत आहे. धार्मिकदृष्ट्या या व्रताचे विशेष महत्त्व आहे. या व्रताने काय फायदे होतात व ते कसे करावे याबद्दल जाणून घेऊया.

Shukra Pradosh Vrat- आज शुक्र प्रदोष व्रत, काय आहे महत्त्व आणि पूजा विधी
प्रदोष व्रत Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 23, 2022 | 10:43 AM
Share

मुंबई,  ज्या प्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेसाठी एकादशीला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रदोषला महत्त्व  आहे.  भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत शुक्रवारी येत असल्याने हा शुक्र प्रदोष व्रत (Shukra Pradosh Vrat 2022) आहे. शुक्र प्रदोष व्रत केल्याने सुख-समृद्धी वाढते, असे मानले जाते. या व्रताचे पालन करून भगवान शिवाची पूजा केल्याने धन, संपत्ती, वैभव आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते. मृत्यूचे भय दूर होते तसेच अकाल मृत्यू होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे.

शुक्र प्रदोष व्रत 2022 –

हिंदू दिनदर्शिकेनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 01.17 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी, 24 सप्टेंबर, शनिवारी पहाटे 2.30 वाजता संपते. उदयतिथी आणि प्रदोष पूजा मुहूर्तानुसार शुक्र प्रदोष व्रत 23 सप्टेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे.

प्रदोष पूजा मुहूर्त –

23 सप्टेंबर रोजी शुक्र प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.17 ते 08.39 पर्यंत आहे. जे लोक या दिवशी उपवास ठेवतात, त्यांना शिवपूजेसाठी 02 तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल. प्रदोष व्रताची पूजा प्रदोष मुहूर्तावरच करणे महत्त्वाचे आहे.

सिद्ध आणि साध्य योगात शुक्र प्रदोष व्रत –

शुक्र प्रदोष व्रत तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे आणि तुमच्या कार्यात यश मिळवून देणारे आहे, कारण या दिवशी सिद्ध आणि साध्य योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळपासून सकाळी 9.56 पर्यंत सिद्ध योग असतो. तेव्हापासून, एक साध्य योग आहे, जो दुसऱ्या दिवशी सकाळी 09:43 पर्यंत राहील. हे दोन्ही योग शुभ आहेत.

अशी करा पूजा-

या दिवशीय स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून हातात जल, अक्षदा आणि फुल घेत व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात किंवा घरात बेलपत्र, धूप, अक्षदा, गंगाजल आदीने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे.  दरम्यान, पंचामृतने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगवर बेलपत्र, धोतराचे फुल, कन्हेरचे फुल, धूप, दीप, फळ, पान सुपारी आदी अर्पण करावे. पूजा दरम्यान ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जाप करावा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावत शिव चालीसा पाठ करावा. शेवटी भगवान शंकराची आरती करावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?