
यावर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण आज आहे. काही वेळातच या ग्रहणाला सुरूवात होणार आहे. सप्टेंबरमध्ये होणारे हे या वर्षीचे सर्वात मोठे चंद्रग्रहण असून भारतासह अनेक भागांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी चंद्र लाल रंगाचा दिसेल. हे पूर्ण ग्रहण आहे. यामुळे रात्री काहीवेळ रात्री चंद्राचा प्रकाश कमी होईल. भारतातील लोक हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी देखील बघू शकतात. या ग्रहणाच्या काळात शुभ कार्य, स्वयंपाक आणि अन्न खाणे, स्नान, झोपणे, पूजा या गोष्टी करण्यास मनाई केली जाते. ग्रहणात धार्मिक महत्व आहे. सुतक काळ संध्याकाळी 6:36 पासून सुरू होईल.
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर पडते. यामुळे पूर्ण चंद्रग्रहण होते. या काळात, चंद्र पूर्णपणे अंधारात लपत नाही, तर तो गडद लाल आणि केशरी रंगाचा होतो. चंद्रग्रहण 2025 चा सामान्य सुतक काळ दुपारी 12:57 वाजता सुरू होईल. या सुतकात मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. चंद्रग्रहण संपताच हे सुतक देखील संपेल.
हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशात सुद्धा दिसणार आहे. पूर्ण भारतात नाही तर ठराविक शहरांमध्येच हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू परंपरेनुसार, चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. या वर्षी चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. यावेळी विशेष खबरदारी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. ग्रहणाच्या वेळी तुम्ही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये, त्याचबरोबर घरातील पूजास्थळावर पडदा किंवा कापड देखील लावावे, असे सांगितले जाते.
असे सांगितले जाते की, ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर हानिकारक किरणे पसरतात. म्हणून घरातच राहावे आणि ग्रहणाकडे थेट घराबाहेर पडणे टाळाले. हेच नाही तर ग्रहण संपल्यानंतर लगेचच अंघोळ करावी, असेही सांगितले जाते. बरेच लोक ग्रहण संपल्यानंतर अंघोळ देखील करतात. भारतामध्ये ग्रहणाबद्दल अनेक श्रध्दा असल्याचे बघायला मिळते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)