Tulsi Upay : तुळशीच्या मुळाच्या या उपायाने चमकेल तुमचे भाग्य, हे नियम अवश्य पाळा

ज्योतिष शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाच्या मुळाशी काही छोटे उपाय (Tulsi Upay Marathi) सांगितले आहेत, ज्याद्वारे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात.

Tulsi Upay : तुळशीच्या मुळाच्या या उपायाने चमकेल तुमचे भाग्य, हे नियम अवश्य पाळा
तुळशी उपाय
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 09, 2023 | 10:16 AM

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे, हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय मानले जाते. तुळशीची रोज पूजा केली जाते आणि तीला जल अर्पण करण्याचीही प्रभा आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप घरात लावल्याने घरामध्ये कधीही संकट येत नाही आणि पैशाची कमतरता भासत नाही, कारण तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. इतकेच नाही तर रोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मकता येते. इतर मान्यतेनुसार, तुळशीचे रोप जितके पवित्र तितकेच तिची मुळे देखील पवित्र मानले जातात. होय, ज्योतिष शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाच्या मुळाशी काही छोटे उपाय (Tulsi Upay Marathi) सांगितले आहेत, ज्याद्वारे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया काय करावे.

1. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी

जर तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असाल आणि तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. यामुळे तुम्हाचा आर्थिक आवकचा मार्ग मोकळा होतो आणि तुमचे आर्थिक संकट दूर होते.

2. आर्थिक आवक वाढवण्यासाठी उपाय

याशिवाय, पैसा आकर्षित करण्यासाठी, तुळशीचे मूळ घ्या आणि ते चांदीच्या तावीजमध्ये बंद करून आपल्या गळ्यात घाला. असे केल्याने तुमची पैशाशी संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतील. तसेच असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

3. कामातील यशासाठी

जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल आणि मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल, तर तुळशीच्या मुळाशी थोडेसे घेऊन गंगाजलाने धुवून त्याची यथायोग्य पूजा करा. यानंतर तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात.

4. ग्रहांच्या शांतीसाठी

जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल आणि तुम्हाला ती शांत करायची असेल तर तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढावे. यानंतर लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्या किंवा चांदीच्या तावीजमध्ये घालून हातावर बांधा, फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)