अयोध्येच्या राम मंदिरात आणखी एक प्राणप्रतिष्ठा सोहळा, 7 देवी-देवता विराजमान!

अयोध्येतील राम मंदिरात राम दराबार तसेच एकूण सात मंदिरांत देवांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

अयोध्येच्या राम मंदिरात आणखी एक प्राणप्रतिष्ठा सोहळा, 7 देवी-देवता विराजमान!
ayodhya ram temple
| Updated on: Jun 05, 2025 | 7:26 PM

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदीर हे संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. याच मंदिरात आता गुरुवारी (5 जून) राम दराबारासोबतच एकूण सात मंदिरांत देवांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. या सोहळ्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुक्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या कार्यक्रमास हजेरी लावली.

शूभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर भगवान राम आणि माता सीता यांची पूजा केली. राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापणा गंगा दशहराच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11 वाजून 25 मिनिटांपासून ते 11 वाजून 40 मिनिटे या मुहूर्तावर करण्यात आली.

यथायोग्य विधी आणि पूजा करून प्राणप्रतिष्ठापणा

यावेळी श्रीराम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेदरम्यान सर्व पूजा आणि विधी यथायोग्य पद्धतीने करण्यात आले. येथे सर्व देवी-देवतांचे यज्ञमंडपात पूजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या अगोदरच योगी आदित्यनाथ हे कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले होते. त्यानंतर राम दरबारातील मूर्तीववरील अनावरण हटवण्यात आले.

बुधवारीही 2 तास पूजा

अयोध्येतील राम मंदिरात बुधवारी सकाळी सहा वाजताच यज्ञमंडपात 2 तास पूजा करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजेपासून साडे बारावाजेपर्यंत राम दरबारासह देवांच्या सर्व मूर्तींचा अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाला एकूण एक हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते.