
आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, आपण 2026 मध्ये पदार्पण करणार आहोत, येणारं वर्ष मला, माझ्या कुटुंबाला सुख समाधानाचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी गेलं पाहिजे, नव्या वर्षात सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर झाल्या पाहिजेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते, नवं वर्ष आनंदाचं जावं यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. वास्तुशास्त्रामध्ये देखील काही सोपे उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, अशाच काही सोप्या उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रात नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी करायचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठावे, अंघोळ करून देवाची पूजा करावी, प्रार्थना करावी. त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याजवळ एक पाण्यानं भरलेला तांब्या ठेवावा. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते. हे जग पाच तत्वापासून बनलेलं आहे, त्यातील महत्त्वाचं तत्व हे पाणी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा घराच्या उंबऱ्याजवळ पाण्यानं भरलेला तांब्या ठेवता, तेव्हा बाहेरून जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, ती घराच्या उंबऱ्यावरच नष्ट होते. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे वास्तुदोष देखील नष्ट होतो. घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं, या उपायामुळे कर्जातून देखील मुक्ती मिळते, आणि वर्षभर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या जाणवणार नाही.
काय काळजी घ्यावी?
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जो पाण्यानं भरलेला तांब्या तुमच्या उंबऱ्याजवळ ठेवणार आहात, तो दाराच्या मधोमध ठेवू नये, तो एका कडेला ठेवावा, तसचे या तांब्यामध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, ठरावीक दिवसांनी हे पाणी नेहमी बदलावं. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेची समस्या कमी होण्यास मदत होते, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे, तसेच इतराही काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)