Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार हा फोटो घरात लावणं म्हणजे मोठं आर्थिक संकट ओढून घेणं, तुमच्याही घरात आहे का?

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात जे फोटो लावता, त्याचाही परिणाम तुमच्या वास्तुवर होत असतो. त्यामुळे घरात कोणताही फोटो लावताना तो विचारपूर्वक लावावा.

Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार हा फोटो घरात लावणं म्हणजे मोठं आर्थिक संकट ओढून घेणं, तुमच्याही घरात आहे का?
वास्तुशास्त्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2025 | 7:47 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे घरातील वास्तुदोषावर उपाय सांगण्याचं काम करतं. घरामध्ये कोणत्याही कारणामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरात वास्तुदोष असेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. या अडचणी टाळण्यासाठी घराची रचना ही नेहमी वास्तुशास्त्रानुसार असावी असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही तुमच्या घरात जे फोटो लावता त्याला देखील खूप महत्त्व आहे. जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी चुकीचा फोटो लावला किंवा अयोग्य दिशेला फोटो लावला तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे फोटो लावताना स्थान नेहमी योग्य़ निवडावं. जसं की पित्रांचा फोटो हा कधीही दक्षिण दिशा सोडून इतर दिशेला लावू नये, किंवा तुमच्या पूर्वजांचे फोटो हे कधीही देवघरात ठेवू नये. तसेच काटेरी वनस्पती असेलेले फोटो, एकटा कृष्ण किंवा एकटी राधा असे फोटो कधीही बेडरूमध्ये ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

दरम्यान वास्तुशास्त्रानुसार असे देखील काही फोटो असतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा फोटोंना वास्तुशास्त्रामध्ये अशुभ मानलं गेलं आहे. असे फोटो घरात लावल्यास तुमच्या घरात अचानक मोठी धनहानी होण्याची शक्यता असते.त्यामुळे असे फोटो घरात लावू नये असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही वाहात्या पाण्याचा फोटो असू नये.

वास्तुशास्त्रानुसार असे काही निसर्ग चित्र आहेत, जे घरात लावले तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. वाहणारे धबधबे, नदी, किंवा वाहत्या पाण्याचा फोटो घरात लावू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. कारण असे चित्र फोटोमध्ये खूप सुंदर दिसतात. मात्र त्यामुळे आपल्या हातात आलेला पैसा देखील वाहत्या पाण्याप्रमाणे हातातून निसटतो असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. तसेच घरामध्ये एखाद्या युद्धाचा प्रसंगी, वाहतं किंवा साचलेलं पाणी असे फोटो असू नयेत, असं वास्तुशास्त्र सांगतं, त्यामुळे कोणत्याही फोटोची निवड करताना ती काळजीपूर्वक करावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)