AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : मनात सारखे नकारात्मक विचार येतायेत? अस्वस्थ वाटतंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय

अनेकदा असं होत की घरात वास्तुदोष निर्माण होतो, वास्तुदोष निर्माण झाल्यास त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. एखाद्याच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येणं, कायम अस्वस्थ वाटणं हा देखील घरात वास्तुदोष निर्माण झाल्याचंच एक लक्षण आहे, आज आपण यावर वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले काही उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : मनात सारखे नकारात्मक विचार येतायेत? अस्वस्थ वाटतंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2026 | 10:03 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये. अनेकदा तुमच्या हातून अशा काही छोट्या-मोठ्या चुका होतात, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते, तेव्हा घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं, यालाच आपण घारात वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. जेव्हा एखाद्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. वास्तुदोषाचा परिणाम हा व्यक्तीच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होतो. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल तर मनात सारखे नकारात्मक विचार येतात, कायम अस्वस्थ वाटतं. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं असतं, त्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या मनातही सारखे नकारात्मक विचार येत असतील, मन अस्वस्थ होत असेल तर दर मंगळवारी भगवान हनुमान यांची पूजा करावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हनुमानाला शक्ती आणि बुद्धीचं प्रतिक मानलं जातं. जेव्हा तुम्ही हनुमानाची मनोभावे पूजा करतात, तेव्हा हनुमानाच्या कृपेनं तुमच्या पाठीमागचे सर्व संकट दूर होतात. तुमच्या मनातील भीती दूर होऊन, नकारात्क विचार देखील बंद होतात. तसेच तुमच्या मनाला स्थिरता लाभते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार दर मंगळवारी सकाळी लवकर झोपेतून उठा, अंघोळ करून हनुमानाच्या मंदिरात जा, हनुमानाची पूजा करा, तसेच हनुमानाला एक नारळ अर्पण करा. दर मंगळवारी हा उपाय केल्यास हनुमानाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील, तसेच मनामध्ये कधीही नकारात्मक विचार देखील येणार नाहीत, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तसेच तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तर त्यापूर्वी हनुमानाची प्रार्थना करा आणि घरातून बाहेर पडताना नेहमी हातावर दही आणि साखर घेऊन ते प्राशन करा, यामुळे तुम्ही ज्या देखील कामासाठी बाहेर पडणार असाल त्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. भगवान हनुमान यांच्या कृपेनं तुम्ही तुमच्या कामात तुम्ही यशस्वी होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?