
वास्तूशास्त्रात असे अनेक नियम सांगितले गेले आहेत, घराबद्दल असो किंवा मग आपल्या रोजच्या सवयी असो. कारण या सर्वांचा आपल्या आयुष्यावर काहीना काही परिणाम होतच असतो. वास्तूशास्त्रानुसार नियमाचे पालन केले तर नक्कीच घरात सुख आणि समृद्धी वाढते अन्यथा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वास्तूशास्त्रानुसार अनेकदा आपल्या दैनंदिन दिनचर्येत आपण अशा काही चुकीच्या गोष्टी करतो. ज्यामुळे नंतर वास्तुदोष निर्माण होतो आणि आर्थिक संकट ओढावते. त्यापैकी एक म्हणजे अंघोळ.
अंघोळ केल्यानंतर आरशासमोर उभे का राहू नये?
होय, अंघोळ म्हणजे आपली रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग. पण यामध्ये देखील आपण अनेकदा अशा चुका करतो की नंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. अंघोळ केल्याने फक्त शरीर शुद्ध होत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी अंघोळ करणे आवश्यक मानले जाते
वास्तुशास्त्रात अंघोळीनंतर काही गोष्टी टाळणे योग्य मानले जात नाही. जसे की काहींना सवय असते की अंघोळ झाल्या झाल्या लगेचच आरशासमोर येऊन आवरू लागतात. पण असे करणे योग्य मानले जात नाही. काही परंपरागत मान्यतांनुसार हे अशुभ मानले जाते. खासकरून वास्तुशास्त्रात. अंघोळ केल्यानंतर लगेचच आरशासमोर उभं राहिल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊ शकते. ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. चंद्र आणि शुक्र ग्रहाचे नकारात्मक प्रभाव वाढू शकतात.असे म्हटले जाते.
त्यामुळे अंघोळ केल्या केल्या आरशासमोर उभे राहू नये. काही वेळ जाऊ द्यावा मग तुम्हाला जे काही आवरायचं असेल ते आवरावं. अंघोळीप्रमाणेच अजुनही अशा काही गोष्टी आहेत ज्या अंघोळीनंतर करणे टाळले पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊयात.
आंघोळ केल्यानंतर लगेच हे काम करू नका
1 वास्तुशास्त्रानुसार, कधीही बाथरूम चप्पल घालून आंघोळ करू नये. यामुळे राहू आणि केतूची अशुभ दृष्टी येते. आंघोळ करण्यापूर्वी नेहमी चप्पल काढून ठेवा.
2 वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की आंघोळीनंतर मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे. उदाहरणार्थ, मांसाहारी पदार्थ, लसूण आणि कांदा खाऊ नये. मान्यतेनुसार, यामुळे राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव वाढतात.
3 आंघोळीनंतर लगेच झोपणे अयोग्य मानले जाते. विशेषतः जर तुम्ही उत्तरेकडे डोके करून झोपलात तर. यामुळे तुमच्या उर्जेच्या प्रवाहात व्यत्यय येऊ शकतो. चंद्र आणि गुरु ग्रहाचे नकारात्मक प्रभाव वाढू शकतात. विश्रांती घ्यायचीच असेल तर आंघोळीनंतर, थोडे ध्यान किंवा प्राणायाम करा, नंतर दक्षिणेकडे डोके ठेवून विश्रांती घ्या.
4 वास्तुशास्त्रानुसार, आंघोळ केल्यानंतर झाडू मारणे किंवा स्वच्छता करणे अशुभ मानले जाते. आंघोळीनंतर तुमची आध्यात्मिक ऊर्जा जास्त असते. झाडू मारल्याने या उर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे घरात सकारात्मकता कमी होऊ शकते आणि शनीचे दोषही वाढू शकतात. आंघोळ करण्यापूर्वी घर स्वच्छ करा किंव झाड-लोट करा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )