Vastu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं, सूर्यदेव होतात नाराज, घरात येते गरिबी
हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे, तसेच प्रत्येक वारी कोणती कामं करायची आणि कोणती नाही हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशी काही कामं आहेत, जी रविवारी करणं अशुभ मानलं जातं. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या कोणत्या देवतेला समर्पित असतो. जसं की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. शनिवार हा शनि देव आणि हनुमान यांना समर्पित आहे. तर रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे. त्या-त्या वारी त्या -त्या देवी देवतेची उपासना केल्यास आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच कोणत्या वारी कोणती कामं करायची आणि कोणती कामं करायची नाहीत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. अशी काही विशिष्ट कामं असतात जी रविवारच्या दिवशी करत नाहीत, रविवार हा सूर्य देवतेला समर्पित वार आहे. आज आपण रविवारच्या दिवशी कोणती कामं करू नयेत आणि त्यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
रविवारी सूर्य देवतेच्या पूजेचं महत्त्व
रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे. त्यामुळे रविवारी सूर्य देवतेची पूजा करणं, उपासना करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्य देवतेला आयुष्यातील अंधाकर दूर करून प्रकाश निर्माण करणाऱ्या देवतेचं प्रतिक मानलं जातं. सूर्य देवतेला तेज, गती आणि आत्मविश्वास यांचं देखील प्रतिक मानलं जातं. त्यामुळे दर रविवारी सूर्य देवतेची पूजा केली पाहिजे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सूर्य देवतेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. सकाळी लवकर अंघोळ करून सूर्य देवतेला जल अर्पण करा, तसेच एक लाल फूल अर्पण करावं, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
रविवारच्या दिवशी कधीही पश्चिम किंवा वायव्य दिशेला प्रवास करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. रविवारी या दोन दिशेला प्रवास करणं अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात.
तांब्याच्या वस्तू विकू नका – रविवारी कधीही तांब्यांच्या वस्तू विकू नये असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. कारण तांबा हा धातू सूर्य देवतेशी संबंधित आहे. तुम्ही जेव्हा रविवारी तांब्याच्या धातूच्या वस्तू विकता किंवा तांबं धातू विकता तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर होतो. जेव्हा कुंडलीमध्ये सूर्य कमजोर होतो, तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या आर्थिक अडचणी येतात. तुम्हाला इतरांकडून मान सन्मान मिळत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)