Vastu Shastra : घरात आर्थिक स्थैर्यासाठी आठवड्यातून एकदा करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही

जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात आर्थिक, कौटुंबीक अडचणी निर्माण होतात. वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका सोप्या उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात आर्थिक स्थैर्यासाठी आठवड्यातून एकदा करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 9:45 PM

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते. या ऊर्जेचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा त्याच्या आयुष्यात विविध अडचणी येऊ शकतात. जसं की त्याच्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही. काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत भांडणं होतात. पत्नी-पत्नीचं पटत नाही. घरात नकारात्मक ऊर्जेमुळे आजारपण देखील वाढतं. त्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट करणं गरजेचं असतं. वास्तुदोष निवारणासाठी वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय दर शुक्रवारी करायचा आहे, शुक्रवार हा वार लक्ष्मी मातेला समर्पित असतो. त्यामुळे हा उपाय केल्यास तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो, आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभतं, तसेच तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

लक्ष्मी मातेची पूजा – शुक्रवार हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असतो. त्यामुळे या दिवशी पहाटे लवकर उठून अंघोळ करावी. लक्ष्मी मातेची पूजा करावी. लक्ष्मी मातेला धनाची देवता मानलं जातं. लक्ष्मी मातेला जास्वंदीचं फूल अर्पण करावं, तसेच नैवेद्य दाखवावा. या व्रतामुळे लक्ष्मी माता आपल्या भक्तांवर सदैव प्रसन्न राहते, लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात, तसेच भविष्यात येणारे संकट देखील लक्ष्मी मातेच्या कृपेनं दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुळशीजवळ दिवा – वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळसीचं झाड हे अत्यंत पवित्र आहे. तसेच हे झाड भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत आवडतं झाडं आहे. त्यामुळे दर शुक्रवारी तुळशीच्या झाडाजवळ सकाळी आणि सध्यांकाळी दिवा लावावा, यामुळे घरातील गरिबी दूर होते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ज्या घरात तुळस असते अशा घरावर कधीही आर्थिक संकट येत नाहीत असं हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळस ही असलीच पाहिजे, असं वास्तुशास्त्र सांगतं.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा -दर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याजवळ न चुकता दिवा लावावा. या उपायामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us