AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरेंचा नातू होणार यशराज फिल्म्सचा हिरो; बॉलिवूडमध्ये बनणार मोठा स्टार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाला यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. या चित्रपटात तो अहान पांडे, शर्वरी आणि बॉबी देओल यांच्यासोबत झळकणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या..

बाळासाहेब ठाकरेंचा नातू होणार यशराज फिल्म्सचा हिरो; बॉलिवूडमध्ये बनणार मोठा स्टार?
बाळासाहेब ठाकरे, ऐश्वर्य ठाकरेImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2026 | 11:36 AM
Share

राजकीय क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी एक असलेल्या ठाकरे कुटुंबातील एक सदस्य राजकारणापासून दूर चित्रपटसृष्टीत आपली नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे गेल्या वर्षी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्याला यशराज फिल्म्स (YRF) बॅनरअंतर्गत एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नाही. या रोमँटिक अॅक्शन चित्रपटात ऐश्वर्यसोबत अहान पांडे, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर ही जोडगोळी पाचव्यांदा एकत्र काम करत आहे. पुढच्या वर्षी 26 मार्च रोजी ऐश्वर्यचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ऐश्वर्य ठाकरेची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे राजकीय आहे. त्याचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबाचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. मात्र आपल्या कुटुंबाचा प्रस्थापित राजकीय वारसा पुढे चालवण्याऐवजी ऐश्वर्यने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला लहानपणापासूनच कला आणि चित्रपटांची खूप आवड होती. यामुळेच त्याने राजकारणाऐवजी चित्रपटसृष्टीतलं करिअर निवडलं आहे.

अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ऐश्वर्यने त्यातील बारकावे नीट समजून घेतले होते. त्याने संजय लीला भन्साळी यांच्या 2015 मधील ब्लॉकबस्टर ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर कॅमेरासमोर येण्यापूर्वी त्याने त्याचं अभिनयकौशल्य सुधारण्यासाठी बराच वेळ घेतला. अखेर अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला पहिली ऑफर मिळाली.

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या इतर स्टारकिड्सच्या तुलनेत ऐश्वर्य सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 17 हजार फॉलोअर्स आहेत. त्यावर त्याने फक्त आठ पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्याने आजोबांसोबतचा एक खास थ्रोबॅक फोटोसुद्धा पहायला मिळतोय. ऐश्वर्य इन्स्टाग्रामवर कमी सक्रिय असला तरी त्याच्या टॅग केलेल्या व्हिडीओंमध्ये त्याचं उत्कृष्ट नृत्य कौशल्य दिसून येत आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच ऐश्वर्याचं वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय ठरला होतं. अभिनेत्री अलाया एफसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अलायाने या चर्चा फेटाळत तो फक्त जवळचा मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Follow Us
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय