Vastu Shastra : तुम्हालाही सारखी वाईट, भीतीदायक स्वप्न पडतात, मग जाणून घ्या कारणं आणि उपाय
अनेकदा आपण एखाद्या नव्या ठिकाणी जातो, तिथे झोपल्यानंतर किंवा कधी-कधी आपल्या घरात देखील आपल्याला भीतीदायक आणि वाईट स्वप्न पडतात. असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? याबद्दल वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आंलं आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण अनेकदा एखाद्या नव्या ठिकाणी जातो. ती जागा आपल्याला पूर्णपणे नवीन असते. अशा ठिकाणी बऱ्याचवेळा आपल्याला शांत झोप देखील लागत नाही, आणि समजा झोप लागलीच तर काही वाईट स्वप्न किंवा भीती वाटावी अशी स्वप्न पडतात. कधी-कधी तर आपल्या घरी देखील आपल्याला अशी स्वप्न पडतात. अशा स्वप्नांमुळे आपल्याला नंतर शांत झोप देखील लागू शकत नाही. जर अशी स्वप्न तुम्हाला तुमच्या घरातही वारंवार पडत असतील तर वेळीच सावध होणं गरजेचं असतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. वाईट आणि भीतीदायक स्वप्न तुम्हाला का पडतात? त्यामगची कारणं काय आहेत? आणि अशी स्वप्न तुम्हाला जर वारंवार पडत असतील तर त्यावर उपाय काय करायचे? त्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे, आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
वाईट स्वप्न का पडतात?
वाईट स्वप्न पडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा, जर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला तर ऊर्जा संतुलन बिघडतं, अशावेळी तुम्हाला भीतीदायक किंवा वाईट स्वप्न पडू शकतात. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, याचा हा एक मोठा संकेतच असतो. अनेकदा तुम्ही नव्या ठिकाणी जाता, तिथे देखील तुम्हाला असाच अनुभव येतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा ठिकाणी जी नकारात्मक ऊर्जा असते, त्याचा तो परिणाम असतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन महत्त्वाचं मानलं जातं.
उपाय
जर तुम्हाला देखील भीतीदायक आणि वाईट स्वप्न पडत असतील तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. एक तर तुमच्या झोपण्याची दिशा लक्षात घ्या, कधीही डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला अशीच झोपण्याची दिशा असावी. कधीही पाय दक्षिणेला आणि डोकं उत्तरेला करू नका. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे जर तुम्हाला वारंवार भीतीदायक स्वप्न पडत असतील तर एका बाटलीमध्ये थोडं सैंधव मीठ भरा आणि ही बाटली झोपताना नेहमी तुमच्या उशीजवळ ठेवा, त्यामुळे अशा प्रकारची स्वप्न पडणं बंद होतील, असही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)