
ग्रहांमध्ये शनि देवांना विशेष महत्त्व आहे. शनि देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनि देव हे नेहमी व्यक्तींना आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवावेत असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात शनिची साडेसाती येते, साडेसाती म्हणजे असा काळ असतो, की त्या काळात तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात, तुम्हाला अचानक नुकसान देखील होऊ शकतं. मात्र साडेसाती सुरू असताना तुम्ही जर नियमित शनि महाराजांची सेवा केली, त्यांची प्रार्थना केली, त्याचसोबत आणखी काही सोपे उपाय केले तर तुमच्यावर शनि महाराजांची कृपा सदैव राहते आणि तुम्हाला शनि साडेसातीचा त्रास देखील होत नाही. वास्तुशास्त्रात देखील शनिदोष दूर करण्यासंबंधी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार अशा काही छोट्या -छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या घरात शनिदोष निर्माण होऊ शकतो, ज्याचा मोठा फटका तुम्हाला बसण्याची शक्यता असते, जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
नैऋत्य दिशा – नैऋत्य दिशा अर्थात दक्षिण -पश्चिम दिशा ही शनिदेवांची दिशा मानली जाते, याच दिशेला सुख -शांती आणि आर्थिक स्थैर्यचं प्रतिक देखील मानलं जातं. मात्र तेव्हा तुमच्या घराची नैऋत्य दिशा ही अस्वच्छ असते, या दिशेला घरातील काही टाकावू वस्तू किंवा भंगार पडलेले असेल, तर तुमच्या घरात शनिदोष निर्माण होतो. त्यामुळे घराची नैऋत्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं.
पाण्याशी संबंधित वस्तू – नैऋत्य दिशेला कधीही पाण्याशी संबंधित वस्तू ठेवू नये, जसं की पाण्याची टाकी, माशांचा टँक इत्याही, अशा गोष्टी नैऋत्य दिशेला ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे,त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो. अचानक काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शनिदोष टाळण्यासाठी नैऋत्य दिशेला पाण्याशी संबंधित वस्तू ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
आरसा – नैऋत्य दिशेला आरसा ठेवणं टाळवं, कारण नैऋत्य दिशेला आरसा ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात काहीही वाद नसताना भांडणं होतात, आर्थिक स्थैर्य राहत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)