Vastu Shastra : घरात ही वस्तू ठेवली तर लागतो कुबेरदोष, गरिबी आयुष्यात पाठ सोडत नाही

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात ज्या वस्तू ठेवत असतात, त्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा तुमच्या आयुष्यावर पडत असतो. जर नकारात्मक प्रभाव पडला तर त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे?

Vastu Shastra : घरात ही वस्तू ठेवली तर लागतो कुबेरदोष, गरिबी आयुष्यात पाठ सोडत नाही
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 8:42 PM

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? केवळ एवढीच माहिती देण्यात आलेली नाही. तर तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही महत्त्वाची असते, त्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा आणि दिशा ठरलेली असते, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्या तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जसं की काहीही कारण नसताना घरात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, तुम्ही कितीही पैसा कमावला तर तो हातात टिकत नाही, किंवा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे, ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

भंगार सामान, किंवा रद्दी – वास्तुशास्त्रानुसार घरात भंगार सामान किंवा रद्दी दीर्घकाळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे. विशेषत: तुम्ही जेव्हा असं भंगार सामान हे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवता, तेव्हा त्याचा परिणाम हा अधिक तीव्र असतो, त्यामुळे घरात कुबेरदोष निर्माण होतो. कुबेर महाराज नाराज होतात. कुबेर यांना धनाची देवता मानलं गेलं आहे, त्यामुळे घरात जर कुबेरदोष निर्माण झाला तर गरिबी तुमची आयुष्यभर पाठ सोडत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे कधीही घराच्या उत्तर दिशेला भंगार सामान किंवा इतर गोष्टी ठेवू नये, घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असावी, ज्यामुळे कबेर महाराज प्रसन्न होतील, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची कमी भासणार नाही.

ज्याप्रमाणे घराची उत्तर दिशा ही स्वच्छ असावी, या दिशेला कोणताही राडा असू नये, त्याचप्रमाणे घराच्या पश्चिम दिशेला देखील कोणताही राडा किंवा टाकावू वस्तू असू नये, असं देखील वास्तूशास्त्रामध्ये म्हटलं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही शनी देवांची दिशा असते, जर ही दिशा अस्वच्छ अलेल, तर घरात शनीदोष निर्माण होतो. घरात शनीदोष निर्माण झाल्यास काही कारण नसताना भांडण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)