AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ फळापासून बनवा हेल्दी होममेड टुटी-फ्रुटी, जाणून घ्या रेसिपी

रंगीबेरंगी टुटी फ्रुटी आपल्याला अनेकदा केक, शेक आणि बेकरीच्या पदार्थांमध्ये पाहायला मिळते. तर ही टुटी-फ्रुटी तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि एका कच्चा फळापासून हेल्दी पद्धतीने बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण रेसिपी जाणून घेऊयात.

'या' फळापासून बनवा हेल्दी होममेड टुटी-फ्रुटी, जाणून घ्या रेसिपी
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 12:06 AM
Share

रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी चवीला गोड असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडते. तर टुटी-फ्रुटीचा वापर केक, आईस्क्रीम, कुकीज आणि गोड बन्स यांसारख्या अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बाजारात टुटी-फ्रुटी सहज मिळत असली तरी, तुम्हाला माहित आहे का की ती घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या गोष्टींची आवश्यकता नसते. घरात उपलब्ध असलेल्या कच्च्या पपईपासून चविष्ट आणि रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी तयार करता येते.

कच्च्या पपईची चव सौम्य असते, त्यामुळे त्यात मिक्स केलेले रंग आणि गोड पदार्थ सहज विरघळतात. म्हणूनच बाजारात मिळणारी बहुतेक टुटी-फ्रुटी कच्च्या पपईपासून बनवलेली असते. जर तुम्हाला तुमच्या मुलांना घरी बनवलेली अधिक आरोग्यदायी टुटी-फ्रुटी खाऊ घालायची असेल, तर ही सोपी रेसिपी आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

कच्च्या पपईमधील पोषण आणि फायदे

कच्ची पपई पिकलेल्या पपईइतकीच पौष्टिक असते. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स लक्षणीय प्रमाणात असतात. शिवाय कच्च्या पपईमध्ये ‘पेपेन’ नावाचे एक एन्झाइम असते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते. वजन नियंत्रण, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी (डिटॉक्सिफाय करण्यासाठी) सुद्धा कच्ची पपई फायदेशीर मानली जाते.

कच्ची पपईपासून टुटी-फ्रुटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 मध्यम आकाराची कच्ची पपई, 2 कप साखर, 3 कप पाणी, विविध खाद्य रंग, 1 छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, 1 मोठा चमचा लिंबाचा रस

टुटी फ्रुटी कशी बनवायची?

सर्वप्रथम कच्ची पपई सोलून तिच्या बिया काढून घ्या. तिचे लहान चौकोनी तुकडे करा. नंतर, एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात पपईचे तुकडे टाका आणि 5 ते 7 मिनिटे हलके उकळवा. तुकडे खूप मऊ होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर पाणी गाळून शिजलेले पपईचे तुकडे ताटलीत बाजूला ठेवा. दुसऱ्या पातेल्यात साखर आणि पाणी घालून पाक तयार करा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर त्यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला इसेन्स टाका. पाकात शिजवलेले पपईचे तुकडे टाका आणि 10 ते 15 मिनिटे शिजवा, जेणेकरून गोडवा चांगला मुरेल.

पपईचे तुकडे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये समान प्रमाणात काढून घ्या आणि प्रत्येक भांड्यात वेगवेगळ्या रंग टाका आणि चांगले मिक्स करून घ्या. आता हे तयार मिश्रणावर झाकून ठेवा आणि 7 ते 8 तास किंवा रात्रभर तसेच राहू द्या.

दुसऱ्या दिवशी यातील जास्तीचा पाक चाळणीतून गाळून घ्या. त्यानंतर ते एका ताटात किंवा ट्रेवर पसरवून काही तास कडक उन्हात किंवा घरात फॅनच्या हवेवर सुकू द्या.

अशा प्रकारे तुमचे होममेड हेल्दी टुटी-फ्रुटी तयार आहे.

Follow Us
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले...
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले; मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं
जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरेंनी सांगितलं 2008
Raj Thackeray | जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा..
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा उलटली अन् पोरं...
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; 'सैराट'शी कनेक्शन काय?
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातड
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण; पाणीपुरवठ्याच्या वादाचं..
Raigad | पाणीपुरवठ्याच्या वादाचं हिंसक रूप!; भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका,
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा