पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
हवामान खात्याने (IMD) देशातील २३ राज्यांसाठी, ज्यात महाराष्ट्रही समाविष्ट आहे, एक गंभीर हवामान इशारा जारी केला आहे. उद्यापासून पुढचे १७ तास मुसळधार पाऊस आणि ताशी ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. झाडे कोसळणे, कमी दृश्यमानता आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. निम्न दाब क्षेत्रामुळे हे बदल अपेक्षित असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याचा उद्या 26 ऑगस्टसाठीचा अंदाज आला आहे. आयएमडीने घाबरवणारा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या भाकितानुसार, दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत हवामानात मोठा बदल होणार आहे. उद्या पावसासोबतच प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे सर्वांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 23 राज्यातील लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे तर उद्या ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. पुढचे 17 तास धोक्याचे असल्याने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन आयएमडीने केलं आहे. तसेच महाराष्ट्रासाठीही अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसासोबतच वेगाने वारे वाहणार असल्याने झाडांच्या फांद्या तुटून कुणाच्याही अंगावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसात झाडाखाली उभे राहू नका. जर बाहेर जाण्याचा प्लानिंग असेल तर एकदा हवामानाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडा. कारण ड्रायव्हिंग करताना पुरेशी दृश्यमानता मिळेलच याची काही शाश्वती नसणार आहे. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेगाने वारे वाहणार असल्याने अशा परिस्थितीत समुद्रात मासेमारीसाठी जाणं धोक्याचं ठरणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना नुकसान होण्याची शक्यता आहे.
निम्न दाबाचं क्षेत्र
झारखंडच्या आसपासच्या परिसरात निम्न दाबाचं क्षेत्र बनणार आहे. एक दिवस आधीच गंगा मैदानी परिसरात आणि ओडिशाच्या उत्तरेकडील परिसरात निम्न दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे झारखंडमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हे निम्म दाबाचं क्षेत्र पुढे सरकून यूपी आणि बिहारच्या भागात पुढचे तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
23 राज्यांना अलर्ट
आयएमडीने 26 ऑगस्ट रोजी संपूर्ण 23 राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, मेघालय, दक्षिण कर्नाटक, अंतर्गत तटीय भाग, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, तामिळनाडू, तेलंगाणा, पद्दुचेरी आदी राज्यांना आयएमडीने अलर्ट जारी केला आहे.
