AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : ब्लु आर्मीचे 4 सामने-15 खेळाडू, श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिली मॅच केव्हा? जाणून घ्या

India A Squad For Tri Series In Sri Lanka and Schedule : इंडिया ए टीमला ट्राय सीरिजमध्ये श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए विरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळायचे आहेत. जाणून घ्या इंडिया ए टीमचं वेळापत्रक.

Cricket : ब्लु आर्मीचे 4 सामने-15 खेळाडू, श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिली मॅच केव्हा? जाणून घ्या
Tilak Varma Team IndiaImage Credit source: @TilakV9 X Account
| Updated on: May 16, 2026 | 2:03 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर भारतीय युवा खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. बीसीसीआयने गुरुवारी 14 मे रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी 15 सदस्यीय इंडिया ए टीमची (India A) घोषणा केली आहे. इंडिया ए टीम या दौऱ्यात यजमान श्रीलंका ए (India a Tour Of Sri Lanka FOR Tri Series 2026) व्यतिरिक्त अफगाणिस्तान ए विरुद्ध 2 हात करणार आहे. या मालिकेचा थरार हा 9 ते 21 जून दरम्यान रंगणार आहे. एकूण 3 संघांमध्ये 7 सामने खेळवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या निमित्ताने आपण इंडिया ए टीमचं वेळापत्रक जाणून घेऊयात.

इंडिया ए आणि श्रीलंका दौरा

निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी तिलक वर्मा याला इंडिया ए टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. तर रियान पराग उपकर्णधार म्हणून तिलकला सहकार्य करणार आहे. इंडिया ए टीम अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए विरुद्ध प्रत्येकी 2-2 असे एकूण 4 सामने खेळणार आहे. तसेच इंडिया ए टीममध्ये वैभव सूर्यवंशी याला संधी देण्यात आली आहे. तसेच आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका करणाऱ्या युवा आणि प्रतिभावान खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वैभव सूर्यवंशी याची निवड

वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय फलंदाजाने टीम इंडियाचं अंडर 19 क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. वैभवने टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत चॅम्पियन करण्यात बहुमुल्य योगदान दिलं. तसेच वैभवने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातही आपला तडाखा कायम ठेवला आहे. तसेच वैभवला लवकरच टी 20i क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैभवसाठी ही मालिका फार निर्णायक ठरणार आहे.

इंडिया ए टीमचं श्रीलंकौ दौऱ्यातील वेळापत्रक

इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए, मंगळवार, 9 जून.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए, गुरुवार, 11 जून.

इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए, सोमवार, 15 जून.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए, बुधवार, 17 जून.

फायनल, रविवार, 21 जून.

श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सुर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड