Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर या 3 गोष्टी दिसल्या, तर समजून जा नशीब फळफळणार, घरात होणार धनाचा वर्षाव

वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं.

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर या 3 गोष्टी दिसल्या, तर समजून जा नशीब फळफळणार, घरात होणार धनाचा वर्षाव
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 08, 2025 | 4:59 PM

हिंदू धर्माशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे, वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या घराशी संबंधित नाही, म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? कोणत्या दिशेला नसावा? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? देवघर कोणत्या दिशेला असावं? तुमच्या घरातील तिजोरी कोणत्या दिशेला असावी? कोणत्या दिशेला नसावी? याबाबत तर मार्गदर्शन केलंच आहे. मात्र त्यासोबतच अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत, ज्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंध येतो. वास्तुशास्त्रानुसार जर या गोष्टी योग्य पद्धतीनं न केल्यास अनेक संकट निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे लोक आपल्या वास्तुची निर्मिती करण्यापूर्वी वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घेतात.

दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात काय असावं आणि काय असू नये? याबद्दल देखील सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. घरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो, त्या वस्तू घरात ठेवता कामा नये असं वास्तुशास्त्र सांगतं. जर उदाहरण द्यायचं झालं तर घरात असलेलं भंगार सामान, कचरा अशा गोष्टी. यामुळे घरात नकारात्मक ऊर्ज तयार होते असं वास्तुशास्त्र सांगतं.

दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला लवकरच पैशांची प्राप्ती होणार आहे, तुमच्या घरावर धनाचा वर्षावर होणार आहे, याचे ते संकेत असतात. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे.

मुंगूस – वास्तुशास्त्रानुसार मुंगूस आहे एक शुभ प्राणी आहे, ज्याला भगवान विष्णूचं प्रतीक मानलं गेलं आहे, जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुंगूसाचं दर्शन झालं तर तो एक शुभ संकेत असतो.

भरतद्वाज पक्षी – हा पक्षी देखील अत्यंत शुभ मानला गेला आहे, वास्तुशास्त्रानुसार सकाळी जर या पक्ष्याचं दर्शन झालं तर घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरामध्ये पैसे येतात.

देवी देवतांचे फोटो, किंवा मुर्ती – वास्तुशास्त्रानुसार जर सकाळीच तुम्हाला देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्तीचं दर्शन झालं तर ते अत्यंत शुभ असतं. तुमचे सर्व कष्ट दूर होतात.