Vastu Shastra : कर्ज वाढतच चाललंय, फिटता फिटत नाहीये? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय
अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. एकदा कर्ज घेतलं की ते नाव लवकर फिटत नाही. कर्ज लवकर फिटावं, हातात पैसा टिकावा यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकांसोबत असं घडतं की ते दिवस रात्र कष्ट करतात, प्रचंड मेहनत करतात, परंतु तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. कोणत्या न कोणत्या काराणांमुळे तो खर्च होतो. तसेच काही जण असे देखील असतात ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं, त्यांना हे कर्ज लवकर फेडायचं असतं, कर्जातून मुक्त होण्याची इच्छा असते, त्यासाठी ते खूप कष्ट करतात, परंतु त्यांना काही कर्ज फेडण्यात यश येत नाही. उलट ते वाढतच जातं. तुम्ही कधी विचार केला आहे का असं का होतं? त्यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तेव्हा देखील अशी स्थिती निर्माण होऊ शकते. तुमची तिजोरी सतत पैशांनी भरलेली राहावी, तुमच्यावर जे काही कर्ज असेल ते लवकर फिटावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे घराला बरकत प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
शुक्रवारचा उपाय – हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहे. लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. ज्याच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते, अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासत नाही, असा व्यक्ती लवकरच कर्ज मुक्त होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आपल्यावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर शुक्रवारी सकाळी अंघोळ करून तुमच्या घराच्या जवळ जिथे लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तिथ जायचं, लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची, तसेच लक्ष्मी मातेला लाल फूल अर्पण करायचं, यथा शक्ति प्रसाद अर्पण करायचा, हा उपाय सलग 16 शुक्रवार केल्यास लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
शनिवारचा उपाय – अनेकदा एखाद्या व्यक्तीची आपल्या नोकरीला किंवा व्यवसायला वाईट नजर लागते, त्यामुळे आपली आर्थिक प्राप्ती मंदावते असं होऊ नये, यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर भगवान हनुमानांचं दर्शन घ्यावं, हनुमानांना रूईची फूलं तसेच तेल अर्पण करावं, या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)