Vastu Shastra : या तीन दिवशी कधीच करू नका नव्या घरात गृहप्रवेश, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्र हे तुमच्या वास्तुशी अर्थात घराची संबंधित एक शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या विविध वास्तुदोषांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतात. आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : या तीन दिवशी कधीच करू नका नव्या घरात गृहप्रवेश, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 10:00 PM

आपलंही एक घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी माणूस प्रचंड कष्ट करतो. पैसा कमावतो, आपल्या आयुष्यभराचा पैसा माणूस हा घरात लावतो. अनेकांना तर खूप कष्ट करून देखील आपल्या मनासारखं किंवा नवं घर खरेदी करता येत नाही. तर असे लोक अनेकदा जुनं आणि तुलनेनं कमी किंमत असलेलं घर खरेदी करतात. वास्तुशास्त्रानुसार घर नवं असू द्या, किंवा जुनं पण घरात जाण्यापूर्वी घराची वास्तुशांती ही झालीच पाहिजे. जर कोणत्याही कारणामुळे वास्तुशांती नाही झाली तर कमीत कमी गणपतीचं पूजन करून, घरात प्रवेश करावा. मात्र तुम्ही जेव्हा एखादं जुनं घर घेता, तेव्हा त्यामध्ये वास्तुदोष असण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. जसं की जर तुम्ही जुनं घर घेतलं असेल तर सर्वात आधी त्या घराला रंग देऊन घ्यावा, त्यामुळे या घरातील आधी असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच घरात प्रवेश करण्यापूर्वी त्या घराच्या दारावरून थोडी मोहरी ओवाळून टाकावी, त्यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान आज आपण जाणून घेणार आहोत की, नव्या घरात प्रवेश करण्याचा योग्य मुहूर्त कोणता असतो, तसेच घरात कोणत्या दिवशी प्रवेश करणं अशुभ मानलं गेलं आहे? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नव घर खरेदी करता तेव्हा त्याची वास्तुशांती करावी, त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. मात्र अनेकदा वास्तुशांती करणं शक्य होत नाही, अशावेळी गणपतीची पूजा करू मगच घरात प्रवेश करावा. गृह प्रवेश कधी करायचा याचे देखील काही मुहूर्त असतात, त्या -मुहूर्तावर जर गृहप्रवेश झाला तर सर्वोत्तम, मात्र तुम्ही जर मुहूर्त पाहिला नसेल तर मंगळवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस सोडून तुम्ही तुमच्या नव्या घरात कधीही प्रवेश करू शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जर तुम्ही तुमच्या घरात मंगळवार, शनिवार किंवा रविवारी प्रवेश केला तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात आर्थिक अडीअडचणी निर्माण होतात. घरात गृहकलह वाढतो, त्यामुळे कधीही नव्या घरात मंगळवारी, शनिवारी आणि रविवारी प्रवेश करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)