Vastu Shastra : पाकिटात या चार वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा हातात कधीच पैसा टिकणार नाही

अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड पैसा कमवतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामंच असतं. असं घडू नये, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : पाकिटात या चार वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा हातात कधीच पैसा टिकणार नाही
पाकिटात या वस्तू कधीही ठेवू नका
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 10:05 PM

वास्तुशास्त्र हे केवळ तुमचं घर कसं असावं? घराच्या मुख्य दरवाजाची दिशा कोणती असावी? घराची रचना कशी असावी? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? तुमच्या घरात तुम्ही ज्या वस्तू ठेवता त्यांची दिशा कोणती असावी? एवढंच सांगणारं शास्त्र नाहीये. तर अनेकदा असं होतं की आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणी येतात. यामागे काही विशिष्ट कारणं असतात. परंतु अनेकदा काही कारण नसताना देखील आपल्याला आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेव्हा काही कारण नसताना अडचणी येतात, तेव्हा त्यामागे वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. वास्तुदोष कसा दूर करायचा? यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच एका उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्या चुकूनही पाकिटात ठेवल्या नाही पाहिजेत, यामुळे हातात पैसा टिकण्यास अडचण निर्माण होते. खर्चाच प्रमाण वाढतं, चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

खोट्या नोटा- वास्तुशास्त्रानुसार पाकिटामध्ये कधीही खोट्या नोटा ठेवू नये, खोट्या नोटा किंवा खेळण्यामधील नाणी ही पाकिटात नसावीत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे तुमच्या खर्चाचं प्रमाण वाढतं, आला पैसा तसा खर्च होतो. हातात पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच अनेकदा तुम्हाला यामुळे व्यवसायामध्ये देखील तोटा होऊ शकतो, असंही वास्तुशास्त्र सांगंतं. त्यामुळे चुकूनही पाकिटात कधीही खेळण्यामधील नोटा, खोटी नाणी ठेवू नयेत, पाकिटात असतील तर ती लगेच बाहेर काढावावीत.

Loading...

पूर्वजांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार पाकिटात कधीही पूर्वजांचे फोटो ठेवू नये, तुम्ही जर तुमच्या एखाद्या मृत पूर्वजाचा फोटो तुमच्या पाकिटात ठेवत असाल तर त्यामुळे घरात वास्तुदोष तर निर्माण होतोच, परंतु सोबतच पितृदोष देखील निर्माण होतो. जर एखाद्या घरात पितृदोष आणि वास्तूदोष असेल तर अशा घरात कधीही पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

याचबरोबर पाकिटात कधीही दुमडलेल्या नोटा आणि जुनी बिलं देखील ठेवू नये, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us