
काही जण नोकरी करतात तर काही जण व्यवसाय. अनेकदा असं होतं की सर्व काही सुरळीत सुरू असतं. मात्र मध्येच काही अडचणी येतात आणि आपली आर्थिक गाडी घसरते, व्यवसायामध्ये मोठा तोटा होतो. व्यवसाय नीट चालत नाही. यामध्ये अनेक कारण असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकरात्माक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. घरात किंवा नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची? त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. हे उपाय केल्यास घर, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
आकरा दिवस करा हे काम – वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला व्यवसायात वारंवार तोटा होत असेल, तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल, व्यवसायाची घडी विस्कटली असेल तर अशा स्थितीमध्ये एक काम करावं. सलग आकरा दिवस एक कमळ पाण्यात भिजू घालावं, बाराव्या दिवशी हे पाणी तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे, तिथे ब्रह्मस्थानावर पाणी शिंपडावं. ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या व्यवसाय ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणची बरोबर मधली जागा. या उपायामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
सायंकाळच्या वेळी दिवा – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर सायंकाळच्या वेळी दररोज तुमच्या दुकानासमोर दिवा लावला तर त्यामुळे सदैव तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहतो. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचा व्यवसाय चांगला चालतो, तसेच तुमची भरभराट होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे,
सूर्याचं चित्र – तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी दुकानाच्या पूर्व दिशेला एक सूर्याचं चित्र लावावं, तसेच उत्तरेला कुबेराची प्रतिमा लावावी, देवघरात लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असावी तिची नियमित पूज करावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)