AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जेवताना ताटात केस निघणं, घरात वारंवार मांजर येणं, या घटनांचा काय असतो संकेत?

तुम्हाला असा अनेकदा अनुभव आला असेल की तुम्ही जेवायला बसला आहात, आणि तुमच्या ताटामध्ये केस सापडला, किंवा तुमच्या घरात वारंवार मांजर येते? या गोष्टींचा नेमका संकेत काय असतो? वास्तुशास्त्रात याबद्दल काय सांगितलं आहे? चला तर मग जाणून घेऊयात.

Vastu Shastra : जेवताना ताटात केस निघणं, घरात वारंवार मांजर येणं, या घटनांचा काय असतो संकेत?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 9:12 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये काही प्राण्यांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, तर काही प्राण्यांना अशुभ मानलं गेलं आहे. प्रत्येक प्राणी पक्षी हा आपल्याला विशिष्ट संकेत देत असतो, अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे. जसं की जर तुमच्या घरासमोर कावळा ओरडत असेल तर तुमच्या घरी लवकरच पाहुणे येणार असा त्याचा संकेत होतो. त्याचसोबत तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्हाला मुंगूस किंवा भारद्वाज पक्षाचं दर्शन झालं तर तुम्हाला दिवसभरात एखादी तरी आनंदांची बातमी मिळणार आहे, असा त्याचा संकेत असतो. जसे काही प्राणी हे शुभ आहेत, तसेच काही प्राण्यांना वास्तुशास्त्रामध्ये अशुभ देखील मण्यात आलं आहे. मात्र मांजराबद्दल दोन भिन्न मते आढळतात, काहींच्या मते मांजर घरात असणं हे शुभ आहे, तर काहींच्या मते घरात वारंवार मांजर येणं अशुभ आहे.आज आपण अशाच दोन गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, एक म्हणजे समजा तुम्ही जेवत असताना जर तुमच्या ताटात केस आढळला तर त्याचा नेमका अर्थ काय होतो? आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर तुमच्या घरात वारंवार मांजर येत असेल तर त्यातून तुम्हाला काय संकेत मिळतो? चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

जेवताना ताटात केसं आढळणे – जेवताना ताटामध्ये केस अनेक कारणांमुळे आढळू शकतो, आरोग्याच्या दृष्टीने देखील ही गोष्ट हानिकारकच आहे. मात्र वास्तुशास्त्रामध्ये देखील जेवताना ताटात केसं आढळला तर तो एक अशुभ संकेत मानला जातो. जर जेवताना तुमच्या ताटात केस आढळला तर भविष्यात तुम्ही एखाद्या अडचणीत सापडणार आहात, तुमच्यावर एखादं संकट येऊ शकतं असा त्याचा अर्थ होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

घरात मांजर येणं – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या जर घरात वारंवार मांजर येत असेल तर त्याला शुभ मानलं गेलं आहे. कारण मांजरांमध्ये नकारात्मक शक्ती ओळखण्याची ताकद असते, जिथे नकारात्मक शक्ती आहे, अशा वातावरणात मांजर राहत नाही, तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे, त्यामुळेच ती तुमच्या घरात येते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप