हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. त्याची पाने धार्मिक विधींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. धार्मिक समारंभांमध्ये काही वस्तू आवश्यक असतात. या वस्तू त्यांच्या शुद्धतेसाठी आणि पावित्र्यासाठी वापरल्या जातात. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पाने. जी विधींमध्ये वापरली जातात. हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पूजनीय मानले जातात. असे मानले जाते की या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मी वास करते. तसेच वास्तुशास्त्रात या वनस्पतीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुळस. तुळशीचे पाने तोडण्याबाबतही अनेक नियम वास्तूशास्त्रात आहेत जे फार कमी लोकांना माहिती असतील. चला जाणून घेऊयात.
या दिवशी तुळशीचे रोप तोडू नका.
शास्त्रांमध्ये तुळशीची पाने तोडण्याबाबत अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांनुसार, एकादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. तसेच, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशीही हे करू नये. शास्त्रांनुसार, आठवड्यात एक दिवस असा असतो जेव्हा तुळशीची पाने तोडू नयेत तो म्हणजे रविवार. असे मानले जाते की या दिवशी तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते.त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. याचा परिणाम आपल्या घराच्या सुख-समृद्धीवर देखील होऊ शकतो.
संध्याकाळी तुळशी तोडू नका.
संध्याकाळी फुले आणि झाडे तोडणे अयोग्य मानले जाते. त्याचप्रमाणे, तुळशीची पाने देखील संध्याकाळी तोडू नयेत. असे म्हटले जाते की संध्याकाळी तुळशीची पाने तोडून तिचा अनादर करू नये. असेही मानले जाते की तुळशीमाता संध्याकाळी विश्रांती घेते. तसेच रात्रीच्या वेळी तुळशीचे पाने तोडणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये.
वास्तुशास्त्र! कोणत्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत? चुकांमुळे गंभीर नुकसान होऊ शकते.
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. त्याची पाने धार्मिक विधींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. धार्मिक समारंभांमध्ये काही वस्तू आवश्यक असतात. या वस्तू त्यांच्या शुद्धतेसाठी आणि पावित्र्यासाठी वापरल्या जातात. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पाने. जी विधींमध्ये वापरली जातात. हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पूजनीय मानले जातात. असे मानले जाते की या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मी वास करते. तसेच वास्तुशास्त्रात या वनस्पतीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुळस. तुळशीचे पाने तोडण्याबाबतही अनेक नियम वास्तूशास्त्रात आहेत जे फार कमी लोकांना माहिती असतील. चला जाणून घेऊयात.
या दिवशी तुळशीचे रोप तोडू नका.
शास्त्रांमध्ये तुळशीची पाने तोडण्याबाबत अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांनुसार, एकादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. तसेच, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशीही हे करू नये. शास्त्रांनुसार, आठवड्यात एक दिवस असा असतो जेव्हा तुळशीची पाने तोडू नयेत तो म्हणजे रविवार. असे मानले जाते की या दिवशी तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते.त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. याचा परिणाम आपल्या घराच्या सुख-समृद्धीवर देखील होऊ शकतो.
संध्याकाळी तुळशी तोडू नका.
संध्याकाळी फुले आणि झाडे तोडणे अयोग्य मानले जाते. त्याचप्रमाणे, तुळशीची पाने देखील संध्याकाळी तोडू नयेत. असे म्हटले जाते की संध्याकाळी तुळशीची पाने तोडून तिचा अनादर करू नये. असेही मानले जाते की तुळशीमाता संध्याकाळी विश्रांती घेते. तसेच रात्रीच्या वेळी तुळशीचे पाने तोडणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. तसेच सुर्यास्तानंतर तुळशीला पाणी घालणे देखील वर्ज मानले जाते.
दरम्यान तुळशीची पाने तोडण्याचे नियम काय आहेत हे देखील जाणून घेऊयात जेणेकरून त्यांचे वाईट परिणाम जाणवणार नाहीत.
तुळशीची पाने तोडण्याचे नियम
नखांनी तुळशीची पाने तोडू नये
नखांनी तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते. तुळशीची पाने नखांनी कधीही तोडू नयेत, त्याऐवजी पाने कायम हलक्या हातांनीच तोडावीत.
आंघोळ न करता स्पर्श करू नये
शास्त्रानुसार, तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे चुकूनही आंघोळ न करता तुळशीला स्पर्श करू नये. आंघोळ न करता तुळशीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते.
परवानगी घ्यावी
शास्त्रानुसार, तुळशीची पाने तोडण्याआधी रोपासमोर हात जोडून देवी लक्ष्मीला विनंती करूनच पाने तोडावीत.
चप्पल,बूट घालू तुळशीजवळ जाऊ नये
तुळशीची पाने तोडताना चप्पल किंवा बूट घालू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते.
या दिवशी तुळशीचे पाने तोडणे वर्ज्य
एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते. जर तुम्हाला भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून ठेवू शकता. तसेच एकादशीव्यतिरीक्त चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या, द्वादशी आणि चतुर्थीला चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)