Vastu Shastra : घरात लावा ही चार झाडं, आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची कमी पडणार नाही, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वनस्पती, झाडं असतात जी जर तुम्ही घरात लावली तर घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. ही झाडं कोणत्या नं कोणत्या देवतेशी संबंधित आहेत. चला तर आज आपण अशाच चार झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात लावा ही चार झाडं, आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची कमी पडणार नाही, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 7:40 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं माण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, तसेच सर्वप्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. वास्तुशास्त्रामध्ये काही वनस्पती या खूपच शुभ माण्यात आल्या आहेत, जर या वनस्पती तुमच्या घरात असतील तर बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला ब्रेक लागतो, तुमच्या घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच येते. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन साधलं जातं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. ज्या घरात ऊर्जेतचं संतुलन योग्य प्रकारचे साधलं जातं, त्या घराचं सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. घरामध्ये पैशांची बचत होते. तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते, तसेच इतरही कोणतं संकट येत नाही. त्यामुळे आज आपण अशा चार झाडांची माहिती घेणार आहोत, की जे वास्तुशास्त्रामध्ये घरात असणे शुभ माण्यात आले आहेत. तसेच या झाडांचा संबंध हा देवी देवतांशी देखील आहे.

गोकर्ण – वास्तुशास्त्रानुसार घरात गोकर्ण नावाची वनस्पती असणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. या वनस्पतीला निळे थोडे आकाशी असे फुलं येतात. या फुलांचा आकार हा गायीच्या कानासारखा असते, म्हणून या वनस्पतीला गोकर्ण असे म्हणतात, ही वनस्पती ज्या घरात असते, त्या घरावर सदैव शनी देवांची कृपा राहते.

Loading...

पारिजातक – पारिजातक या वनस्पतीला देखील वास्तुशास्त्रामध्ये खूप शुभ माण्यात आलं आहे. ही लक्ष्मी मातेचं सर्वात प्रिय झाड आहे, असं म्हणतात ज्या घरात पारिजातकाचं झाडं आहे, तिथे कायम लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. अशा घरात कधीही पैशांची कमी नसते.

तुळस – वास्तुशास्त्रामध्ये तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. तुळस भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे, त्यामुळे प्रत्येक घरात तुळस ही असायलाच पाहिजे, अंस वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

मनी प्लांट – वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला देखील शुभ माण्यात आलं आहे, यामुळे आपल्या घराकडे पैसे आकर्षित होतात, पैशांची कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us