Vastu Shastra : स्वप्नात हे पक्षी दिसणं असतं अत्यंत शुभ, आयुष्यच बदलून जातं
आपल्याला झोपेत अनेक स्वप्न पडतात. परंतु प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतोच असं नाही. परंतु काही स्वप्न अशी देखील असतात, जी तुम्हाला विशिष्ट संकेत देऊन जातात. अशाच काही स्वप्नांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जी अत्यंत शुभ मानली जातात.

हिंदू धर्मामध्ये स्वप्नशास्त्र हा एक स्वतंत्र विषय आहे. स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा तुम्हाला अनेक स्वप्न पडतात. प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतोच असं नाही. तुम्ही दिवसभर ज्या गोष्टींचा विचार करत असता, ज्या गोष्टी सारख्या तुमच्या मनामध्ये असतात, तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण असतात, अशा गोष्टी तुमच्या स्वप्नांमध्ये येऊ शकतात. अशा स्वप्नांना कोणताही अर्थ नसतो. परंतु अशी देखील काही स्वप्न असतात, जी विशिष्ट संकेत देतात. हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. वास्तुशास्त्रामध्ये स्वप्नाचे दोन प्रकार पडतात. एक शुभ फळ देणारी स्वप्न, आणि दुसरं अशुभ फळ देणारी स्वप्न. जेव्हा आपल्याला शुभ फळ देणारी स्वप्न पडतात, तेव्हा आपल्या आयुष्यात निश्चितच काही सकारात्मक बदल होणार असतात, तेव्हाच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट पक्षी आपल्या स्वप्नात दिसणं हे अतिशय शुभ मानलं जातं.
पोपट- वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर स्वप्नात पोपट दिसला तर हे एक अत्यंत शुभ स्वप्न मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये पोपटाला शुभ पक्षी माण्यात आलं आहे. जेव्हा तुमच्या घराची भरभराट होणार असते, तुमच्या आयुष्यात अकस्मात धनलाभाचा योग असतो, तेव्हा तुमच्या स्वप्नात पोपट दिसतो. हा तुमच्या भरभराटीचा संकेत असू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे स्वप्नात पोपट दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.
भारद्वाज – भारद्वाज पक्षी स्वप्नात दिसणं हे देखील एक शुभ स्वप्न मानलं जातं. भारद्वाज पक्षी स्वप्नात दिसणं हे तुमच्या आर्थिक प्रगतीचे संकेत, असू शकतात. जर तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळणार असेल किंवा व्यापारात अचानक मोठा नफा होणार असेल तर तुम्हाला या प्रकारचे स्वप्न पडू शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)