Vastu Shastra : अंगणात वडाचं झाडं असावं की नाही? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना हे शुभ माण्यात आलं आहे, तर काही झाडांना अशुभ माण्यात आलं आहे. काही झाडं ही आपल्या घराच्या परिसरात किंवा अंगणात नसावीत असं वास्तुशास्त्र सांगतं. आज आपण वडाच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला मोठं महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होत नाही, तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं, एवढंच नाही तर वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना शुभ माण्यात आलं आहे तर काही झाडांना अशुभ माण्यात आलं आहे. शुभ झाडी ही आवर्जून आपल्या घराच्या परिसरात अंगणात लावली पाहिजेत, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होत, असतो. यामुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
परंतु अशी देखील काही झाडं आहेत, जी झाडं वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आली आहेत. अशी झाडं घराच्या आसपास किंवा अंगणात असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ही झाडे जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा प्रभाव तुमच्यावर होतो. या झाडांमुळे ऊर्जा संतुलन बिघडतं, त्यामुळे अशी झाडे शक्यतो घरात लावू नयेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु अशी देखील काही झाडं आहेत, जी वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र माण्यात आली आहेत, परंतु तरी देखील ती झाडं घराच्या अंगणात लावू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, आज आपण वडाच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
घरात वडाचं झाडं लाववावं की लावू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये वडाच्या झाडाबद्दल नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल. हिंदू धर्म तसेच वास्तुशास्त्रामध्ये वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. अत्यंत शुभ समजलं जातं. मात्र जरी असं असलं तरी देखील वडाचं झाड हे तुमच्या घराच्या आसपास असू नये, वडाचं झाड हे नेहमी मोकळ्या जागेत असावं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे वडाच्या झाडाचा विस्तार हा प्रचंड असतो, त्याच्या मुळ्या घराला कमकुवत करू शकतात. तसेच मोठ्या वृक्षाची सावली कधीही घरावर पडू नये, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)