AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: मन अस्वस्थ आहे? घर आर्थिकदृष्या अस्थिर बनलं आहे? मग वास्तुशास्त्रातील हे सोपे उपाय कराच

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं मन काहीही कारण नसताना अस्वस्थ होतं, मनामध्ये नकारात्मक विचार येऊ लागतात. तसेच घर देखील आर्थिकदृष्या अस्थिर बनतं, या सर्व समस्यांमागे तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील असू शकतो, त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊयात.

Vastu Shastra: मन अस्वस्थ आहे? घर आर्थिकदृष्या अस्थिर बनलं आहे? मग वास्तुशास्त्रातील हे सोपे उपाय कराच
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 11:34 PM
Share

घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक काही समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या घरात वास्तुदोष असतो, तेव्हा त्या घरात काहीही कारण नसताना सतत भांडण होत राहतात. पती-पत्नीचं पटत नाही. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक एखादी मोठी आर्थिक समस्या येते, त्यामुळे तुमचं सर्व आर्थिक नियोजन कोलमडून पडतं. एवढंच नाही तर तुम्ही जेव्हा घरी असतात तेव्हा तुम्हाला घरात उदास वाटतं, घरात तुमचं मन लागत नाही, त्यामुळे तुमची सारखी चिडचिड होते. मन अस्वस्थ होतं, मनात वाईट विचार येतात. हा सर्व तेथील नकारात्मक वातावरणाचा परिणाम असतो. वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

माशांना खाऊ घाला – जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं, किंवा मनात सारखे नकारात्मक विचार येत असतात, तेव्हा तो नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर झालेला परिणाम असतो. ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे तुमच्या आसपास कुठे तळं असेल किंवा नदी असेल आणि त्यात मासे असतील तर अशा माशांना दररोज थोडे कणकेचे गोळे खाऊ घालावेत, यामुळे तुमचं मन स्थिर होण्यास मदत होते.

कुत्र्यांना खावू घाला- जर तुमचं मन अस्थिर असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील तर अशा वेळी कुत्र्यांना पोळी, भाकरी खावू घालावी, यामुळे तुमचं मन स्थिर होण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

गायीला अन्न द्या – जर तुम्ही आर्थिकदृष्या अस्थिर बनले असाल तर अशावेळी वास्तुशास्त्रात सर्वात प्रभावी उपाय सांगण्यात आला आहे. गो मातेची सेवा करा तिला चार खायला द्या. गो मातेच्या सेवेमुळे घरात आर्थिक स्थिरता येते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता