स्वप्नात पूर्वजांचं दर्शन होणं याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्र काय सांगतं?
सर्वसामान्यपणे आपण दिवसभर जो विचार करतो, काही गोष्टी या अशाच घडाव्यात असं आपल्याला मनातून वाटत असतं, त्याच गोष्टी आपल्या अनेकदा रात्री स्वप्नात देखील दिसतात. परंतु काही स्वप्न अशी देखील असतात, जी आपल्याला विशिष्ट संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात, हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत.

स्वप्न म्हणजे नेमकं काय? एखादं विशिष्ट स्थान, व्यक्ती किंवा एखादी विशिष्ट गोष्टच आपल्या स्वप्नात का येते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याच उत्तर अगदी सोप आहे, तुम्ही दिवसभर ज्या गोष्टी पाहात असतात, ज्या गोष्टींचा वारंवार विचार करत असता, सर्वसामान्यपणे अशाच गोष्टी तुम्हाला स्वप्नात दिसतात. अशा स्वप्नांना फार अर्थ नसतो. परंतु स्वप्नशास्त्रानुसार अशी देखील काही स्वप्न असतात, जी आपल्याला विशिष्ट संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात, हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. अनेकदा एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात वारंवार त्याच्या मृत पूर्वजांचं दर्शन होतं, याचा नेमका अर्थ काय असू शकतो? पूर्वजांना आपल्याला काही संकेत द्यायचा आहे का? असे प्रश्नही तेव्हा त्याच्या मनात सुरू असतात, आज आपण याच सर्व प्रश्नाची उत्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
पूर्वज कधी स्वप्नात येतात
वास्तुशास्त्र आणि स्वप्नशास्त्रानुसार मृत पूर्वज कधीही कोणाच्या स्वप्नात असेच येत नाहीत. समजा त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा त्यांना काहीतरी सांगायचं असेल, भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल काही संकेत द्यायचे असतील तेव्हा तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात. तुमच्या स्वप्नात पूर्वज कोणत्या अवस्थेमध्ये आले, त्यावरून अशा स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार जर समजा पूर्वज तुमच्या स्वप्नात आले आणि ते रडत असतील तर याचा अर्थ त्यांची काहीतरी इच्छा अपूर्ण आहे, ते ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. समजा पूर्वज नुसतेच तुमच्या स्वप्नात आले तर त्याचा अर्थ ते तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहेत असा त्याचा अर्थ होतो. समजा तुम्हाला तुमचे पूर्वज हे अत्यंत समाधानी आहेत, असं स्वप्न पडलं तर लवकरच तुमच्या भाग्य बदलणार आहे, तुमची प्रगती होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)