Vastu Shastra : कोणत्या दिशेचं घर असतं सर्वात शुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, आज आपण जाणून घेणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला असलेलं घर हे सर्वात शुभ असतं?

Vastu Shastra : कोणत्या दिशेचं घर असतं सर्वात शुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 9:54 PM

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? बेडरूमची दिशा कोणती असावी, घरामध्ये देवघर कोणत्या दिशेला ठेवावं, देवघर बनवताना काय काळजी घ्यावी, स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं अशा एकना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. दरम्यान जेव्हा आपण नवं घर खरेदी करतो, किंवा घर बांधतो तेव्हा ते जर वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर घरात अनेक वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर अचानक तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतात. जसं की अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किंवा घरात काही कारण नसताना वाद विवाद होतात. पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. दरम्यान घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातील एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी पूर्व दिशेलाच असावा, कारण पूर्व दिशेला स्वामी हा सूर्य आणि इंद्र देव आहेत. पूर्व दिशेला बुद्धिमत्ता, करिअरमध्ये प्रगती, पैसा आणि आत्मविश्वास यांचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा कधीही हा पूर्व दिशेलाच असावा, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला नसावा? घराचा मुख्य दरवाजा हा कधीही दक्षिण दिशेला नसावा, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे कधीही घराचा दरवाजा हा दक्षिण दिशेला असू नये, जर घराचा दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घराचा दरवाजा जर पश्चिमेला असेल तरी चालतो, उत्तरेला असेल तरी चालतो, दक्षिणेला असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)