
चिंचेचे रोप (Tamarind)- वास्तु आणि फेंगशुई या दोन्ही शास्त्रांच्या मते चिंचेचे रोप घरात लावू नये. या रोपामुळे घरात वाद वाढतात. हे झाड घराभोवती लावणे शक्यतो टाळावे.

कापसाचे रोप (Cotton plant)- महाराष्ट्राचे पांढरे सोनं म्हणून ओळख असणारे कापसाचे रोप देखील घरात ठेवू नये. ही वनस्पती आयुष्यात दुर्दैव आणि गरीबी आणते.

बाभूळ वनस्पती (Acacia plants )- एक काटेरी वनस्पती म्हणून बाभळीच्या वनस्पती पाहिले जाते. या वनस्पतीला वैद्यकशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यात सुंदर पिवळी फुले येतात. पण वास्तू तज्ञांच्या मते हे रोपे घरात ठेवणे टाळाच. या रोपामुळे घरात वाद निर्माण करू शकतात.

मेहंदीचे रोप (Mehndi plant) - वास्तूनुसार मेंदीचे रोप घराभोवती कधीही लावू नये. या वनस्पतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरते असे मानले जाते . त्यामुळे हे रोप घरात लावणे टाळावे.