Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी या तीन खास वस्तू आणा घरी, आयुष्यात कधीच भासणार नाही पैशांची तंगी

हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो, वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे तुम्ही दिवाळीला केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी या तीन खास वस्तू आणा घरी, आयुष्यात कधीच भासणार नाही पैशांची तंगी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 4:40 PM

हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे, या सणाला दीपोत्सव असं देखील म्हणतात, यंदा दिवाळी 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरा करण्यात येणारा हा सण लक्ष्मी पूजन आणि वास्तुदोष दरू करण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा असतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरी आणल्या तर घरातील वास्तुदोष दूर होऊन तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते. घर धन धान्यानं भरून जातं. तसेच घरातील सर्व प्रकाराची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वास्तुदोष नाहीसा होतो, चला तर जाणून घेऊयात या तीन वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दल.

दिवाळीपूर्वी धातूचं कासव घरी आणा – वास्तुशास्त्रामध्ये कासवाला खूपच शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर दिवाळीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी तुमच्या घरात धातूचं कासव आणलं तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, घरातील वास्तुदोष नाहीसा होईल, तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल. धातूचं कासव घरी आणून ते उत्तर दिशेला ठेवा, किंवा ईशान्य कोणात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी घरात धातूचं कासव आणल्यास तुमच्या उत्पन्नात वाढ होते, प्रगतीच्या नव नवीन संधी प्राप्त होतात.

नारळ घरी आणा – वास्तुशास्त्रानुसार नारळ हे लक्ष्मी मातेचं सर्वात प्रिय फळ आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वी घरात नारळ आवश्य आणावं, हे नारळ तुमच्या घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा, किंवा तुम्ही हे नारळ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीजवळ देखील ठेवू शकता. अशा प्रकारे घरात नारळ ठेवल्यानं घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. लक्ष्मी माता प्रसन्न होते.

तुळस – वास्तुशास्त्रानुसार तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अत्यंत प्रिय वनस्पती आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात अजूनही तुळस नसेल तर तुम्ही दिवाळीपूर्वी तुमच्या घरात तुळस आणू शकता, ज्या घरात दररोज तुळशीची पूजा होते, तिला पाणी अर्पण केलं जातं त्या घरावर सदैव माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहतो, त्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं, अशा प्रकारे तुम्ही या तीन गोष्टी दिवाळीपूर्वी तुमच्या घरी आणल्या तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)