Shop Vastu Tips | लक्ष्मीची पावलं दुकानात पडावी असं वाटतंय, हे बदल करुन पाहा

| Updated on: Nov 25, 2021 | 1:53 PM

वास्तूनुसार, दुकानदाराने त्याच्या दुकानात काही बदल घडवून आणले तर त्याचे भाग्य बदलून जाण्यासाठी वेळ लागत नाही. वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक तत्त्वे सांगितली आहेत, ज्याचे भान ठेवून घरासोबत दुकान बांधले तर जीवनात खूप प्रगती होते.

Shop Vastu Tips | लक्ष्मीची पावलं दुकानात पडावी असं वाटतंय, हे बदल करुन पाहा
vastu
Follow us on

मुंबई : वास्तूनुसार, दुकानदाराने त्याच्या दुकानात काही बदल घडवून आणले तर त्याचे भाग्य बदलून जाण्यासाठी वेळ लागत नाही. वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक तत्त्वे सांगितली आहेत, ज्याचे भान ठेवून घरासोबत दुकान बांधले तर जीवनात खूप प्रगती होते. व्यापारी वर्गासाठी त्यांचे दुकान सर्वकाही असते. त्यामुळे दुकानाच्या वास्तुशास्त्रात काही बदल केल्यास देवी लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल, असे मानले जाते वास्तुशास्त्रात दुकानाच्या वास्तुबद्द्ल ही माहिती देण्यात आली आहे. वास्तूनुसार, दुकानाच्या दरवाज्याची दिशा व्यवसायात नफा होणार किंवा तोटा हे ठरवत असते. दुकानाची दिशा कोणत्या बाजूने आहे, याचा परिणाम संपूर्ण व्यवसायावर होतो. चला तर मग जाणून घेऊयात दुकानासंबधीचे काही वास्तू नियम

  • वास्तूशास्त्रानुसार एखादी इमारत किंवा दुकान बांधताना त्याचा सभोवतालच्या वातावरणाशी योग्य समन्वय साधला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार दुकानाच्या दिशा नफा होणार की तोटा ही गोष्ट ठरवत असते. जर दुकान पूर्व दिशेला असेल तर दुकानाचे काउंटर दक्षिण दिक्षेला असायला हवे. आणि मालकांनी उत्तर दिशेला तोंड करून बसावे. असे केल्यास व्यवसायात प्रगती होते.
  • वास्तुशास्त्रानुसार अशा दुकानांचा पुढचा भाग अरुंदच असावा. म्हणजेच पुढचा भाग रुंद आणि मागचा भाग अरुंद असावा. या प्रकारच्या दुकानात व्यवसायात भरपूर नफा मिळतो. याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीच्या देवाचे फोटोसुद्धा येथे लावू शकता.
  • याशिवाय पूर्वाभिमुख दुकानाच्या मालकाने सकाळी लवकर आपले दुकान उघडावे. या गोष्टीचा अवलंब केल्यास व्यवसायात धनप्राप्ती होते अशी मान्यता आहे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Solar Eclipse 2021 | सावधान , या 5 राशींवर होणार वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा अशुभ परिणाम

Vivah Panchami 2021 Date | विवाह पंचमी म्हणजे काय? जाणून घ्या पूजा आणि विधी

नावातच सर्वकाही ! बेस्ट पती हवाय मग या 4 आद्य अक्षर असणाऱ्या व्यक्तींशीच लग्न करा