Solar Eclipse 2021 | सावधान , या 5 राशींवर होणार वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा अशुभ परिणाम

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण डिसेंबरमध्ये होणार आहे, या राशीच्या लोकांसाठी खूप अशुभ सिद्ध होण्याची शक्यता संगण्यात येत आहे.

Solar Eclipse 2021 | सावधान , या 5 राशींवर होणार वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा अशुभ परिणाम
solar eplic


मुंबई : अवकाशात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम मानवी आयुष्यावर होत असतो. नुकतच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले आणि आता वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 4 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण (सूर्यग्रहण 2021) अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. (Solar Eclipse 2021) या काळात सूर्य किंवा चंद्र राहूमुळे हे ग्रहण धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाणार आहे. याच दिवशी मार्गशीर्ष अमावस्याही आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या ग्रहणाचा परिणाम काही राशींवरही दिसणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी हे ग्रहण अशुभ सिद्ध होईल-

मेष (Mesh Rashi)
मेष राशीसाठी हे ग्रहण अशुभ मानले गेले आहे. या ग्रहणामुळे या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या असू होऊ शकतात, त्या प्रमाणे या काळात वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.

कर्क (Karkr Rashi)
कर्क राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अशुभ राहील. या काळात या व्यक्तींच्या आयुष्यात मित्रांसोबत विनाकारण वाद होऊ शकतात, एवढेच नाही तर मुलांच्या बाजूनेही तणाव राहील.

तूळ (Tula Rashi)
सूर्यग्रहण तुळा राशीसाठी अशुभ राहील, या काळात या राशीच्या व्यक्तींनी त्याच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे विनाकारण होणारे वाद टाळा.

वृश्चिक (vrushik Rashi)
वृश्चिक राशीच्या लोकांचे मन सूर्यग्रहणाच्या काळात अशांत राहू शकते. या ग्रहणानंतर त्यांच्या आयुष्यात काही तणाव असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला काम करायला आवडणार नाही.

मीन (Meen Rashi)
सूर्यग्रहणाचा मीन राशीवरही वाईट परिणाम होईल. या काळात नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात वडिलांशी वाद होण्याची शक्यता आहे.

सूर्यग्रहण 2021 वेळ
2021 सालातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवारी 4 डिसेंबर रोजी होत आहे. हा दिवस मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्या देखील आहे. हे सूर्यग्रहण रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि 3:7 पर्यंत चालेल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Radix 1 Prediction : मूलांक 1 साठी अंकशास्त्र काय सांगते? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित मोठे रहस्य

Margashirsh Mass 2021 | सुखी जीवनासाठी, आरोग्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 3 गोष्टी नक्की करा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI