
आजकाल आयुष्य हे खूप धावपळीचं बनलं आहे, आयुष्यात पैसे कमावण्यासाठी चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि आपल्यावर जे लोक अवलंबून आहे, त्यांना एक सुरक्षित जीवन देण्यासाठी आपल्याला प्रचंड धावपळ करावी लागते, ऑफीसमध्ये देखील खूप टेन्शन असतं, अशा स्थितीमध्ये आपल्याला केवळ आपल्या घरातच शांतता मिळू शकते, मात्र घरी सुद्धा अशांत वातावरण असेल तर? घरात नेहमी वाद विवाद होत असतील तर? घरात पैसा टिकत नसेल तर? तर तुमचा स्वभाव देखील चिडचिडा बनतो, मात्र हे नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
घरात लावा ही झाडं – वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत, ती तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतात, या झाडांमुळे सदैव तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतात. प्रत्येक घरामध्ये तुळशीचं झाडं असलंच पाहिजे असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांना तुळशीचं झाडं हे अत्यंत प्रिय असतं. जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचं झाडं लावलं तर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, यासोबत घरात लकी बांबू किंवा मनी प्लांटचं रोपटं देखील तुम्ही तुमच्या घरात लावू शकता.
घराच्या भिंतींचा रंग – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही ज्या घरात राहता, त्या घराच्या भिंतींचा रंग हा सौम्य असला पाहिजे, म्हणजे जास्त भडक नको, जर तुमच्या घरातील भिंतींचा रंग हा सौम्य असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव हा तुमच्यावर आणि तुमच्या घरातील सदस्यांवर पडतो. घरातील भिंतींना सौम्य रंग असेल तर मन शांत राहण्यास मदत होते.
घरातील साफ-सफाई – वास्तुशास्त्रानुसार घर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे, घर जर स्वच्छ असेल तर अशा घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो, आणि घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात. घरात सदैव शांतता राहते, घरात कधीही वादविवाद होत नाहीत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)