Vastu Tips : मुख्य दरवाजा समोरील या 2 वस्तू आजच काढून टाका, घर पैशांनी भरून जाईल

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मु्ख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, घराच्या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरात प्रवेश करत असते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Vastu Tips : मुख्य दरवाजा समोरील या 2 वस्तू आजच काढून टाका, घर पैशांनी भरून जाईल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 8:53 PM

वास्तुशास्त्रामध्ये आपलं घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घराची तिजोरी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत, मात्र अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे तुमचं घर हे वास्तुशास्त्रानुसार योग्य असताना देखील तुमच्या आयुष्यामध्ये अडथळ्यांची मालिका सुरू होते, अचानक मोठ्या प्रमाणात धनहानी होते, कितीही पैसा कमावला तरी तो हातात टिकत नाही. घरात छोट्या -छोट्या गोष्टींवरून वाद होतात. घरात शांतता राहत नाही. घर अस्थिर बनते यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मु्ख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, घराच्या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरात प्रवेश करत असते, आणि त्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होत असतो, त्यामुळे अशा काही वस्तू आहेत, ज्या मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवू नये, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं वास्तुशास्त्र सांगतं आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ जर तुम्ही चपला ठेवत असाल तर त्या आजपासूनच दुसरीकडे ठेवा, घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीही चपला, बूट असू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्ही चपला बूट ठेवत असाल तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, लक्ष्मी माता नाराज होते असं वास्तुशास्त्र सांगतं.

जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर सुकलेली झाडं असतील तर ती काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीच सुखलेली झाडं असू नयेत, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो, ज्याचा प्रचंड फटका तुम्हाला बसू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)