
आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घरात काही कारण नसताना कलह वाढणं, पैशांची तंगी अशी काही वास्तुदोषाची लक्षणं असू शकतात. त्यावर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दरम्यान आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की आपण काही कामांसाठी कर्ज घेतो मात्र हे कर्ज फिटता फिटत नाही, आपल्यावर कर्ज वाढतच जातं. वास्तुशास्त्रामध्ये कर्जमुक्तीसाठी देखील काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आपल्याला कर्जातून मुक्ती मिळू शकते. अशाच काही उपायांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. तूळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं सर्वात प्रिय झाडं आहे. तुळशीचे अनेक आयुर्वेदिक उपाय देखील आहेत, मात्र आज आपण तुळशीचं धार्मिक महत्त्व समजून घेणार आहोत. जर तुमच्यावर खूप कर्ज झालं आहे, कितीती प्रयत्न केला तरी ते फिटत नाही, तर अशावेळी नियमितपणे दररोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीची पूजा करावी, तुळशीला जल अर्पण करावं, तसेच सांयकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे तुम्हाला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो, हळुहळु तुमची कर्जातून सुटका होते, तसेच ज्या घरात तुळस असते त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, कोणतेही वास्तुदोष निर्माण होत नाहीत.
वास्तुशास्त्रामध्ये आणखी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे तुमच्या घरातील तिजोरी ही नेहमी उत्तर दिशेला ठेवा. यामुळे तुम्हाला कधीही धनाची कमी भासणार नाही, कारण उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे तिजोरी ही नेहमी उत्तर दिशेला असावी, अंस वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमचं घर नेहमी स्वच्छ ठेवा, जर तुमचं घर नेहमी स्वच्छ असेल तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुमची प्रगती होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)