Vastushastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका ही 5 कामं, आयुष्य उद्ध्वस्त होईल
अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार सांयकाळची वेळ ही अतिशय महत्त्वाची असते, सांयकाळची वेळ ही घरात लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळच्या वेळी करणं जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वस्तुशास्त्रात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. परंतु अनेकदा असं देखील होतं की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, परंतु तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा त्रास हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात होतो. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष का निर्माण होतो? त्याचं कारण सोपं आहे, तुम्ही दररोज अशा काही छोट्या मोठ्या चुका करत असतात, ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रात सायंकाळची वेळ ही अतिशय महत्त्वाची असते, सायंकाळी आपल्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं असतं, त्यामुळे सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणं हे जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
सायंकाळच्या वेळी झोपू नका – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी झोपणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. कारण सायंकाळच्या वेळी तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असतं, अशावेळी जर तुम्ही झोपत असाल तर लक्ष्मी माता नाराज होते, त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. काहीही कारण नसताना अचानक मोठी आर्थिक संकटं तुमच्यावर येऊ शकतात, त्यामुळे सायंकाळच्यावेळी झोपू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
भांडणं – सायंकाळच्यावेळी कधीही घरात कलह करू नये, घरात शांत वातावरण ठेवावं. जर तुमच्या घरात सायंकाळच्या वेळी सारखी भांडणं होत असतील तर हे अत्यंत अशुभ मानलं जातं. ज्या घरात सायंकाळच्यावेळी सारखी भांडणं होतात, त्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही, घरातील सुख शांती नष्ट होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
तुळशीची पानं तोडू नका- तुळस हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी कधीही तुळशीची पानं तोडू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
कोणालाही पैसा देऊ नका – सायंकाळच्या वेळी तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं असं मानण्यात येतं, त्यामुळे सायंकाळच्यावेळी कोणालाही उधार पैसे देऊ नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
झाडू नका – सायंकाळ होण्याच्या आधीच घराची सर्व प्रकराची स्वच्छता करावी, सायंकाळच्यावेळी घर झाडून घेऊ नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)