AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra: कपाटात ठेवलेल्या या 4 वस्तू ठरतात तुमच्या भाग्यामधील सर्वात मोठा अडथळा, आजच फेकून द्या

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला मोठं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या आसपास ज्या काही गोष्टी असतात त्यांचा तुमच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही गोष्टी घरात ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. ज्या तुमच्या भाग्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.

Vastushastra: कपाटात ठेवलेल्या या 4 वस्तू ठरतात तुमच्या भाग्यामधील सर्वात मोठा अडथळा, आजच फेकून द्या
VASTUSHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:22 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषांवर विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आपण दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे वास्तुदोष दूर करणं आवश्यक असतं, वास्तुशास्त्रानुसार आपण कपाटात वेगवेगळ्या वस्तू ठेवतो, मात्र यातील काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. अशा वस्तूंमुळे तुमच्या घरात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं, किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तोटा होण्याची देखील शक्यता असते. अनेकांच्या बाबतीमध्ये तर असं घडतं, की ते खूप पैसा कमवतात, मात्र त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, तिजोरी रिकामी असते. या सर्वांमागे तुम्ही तुमच्या कपाटात ठेवलेल्या या चार वस्तू असू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

फाटलेले किंवा जुने कपडे – अनेकांना अशी सवय असते की एखादा ड्रेस एकदा वापरला की तो पुन्हा वापरला जात नाही. किंवा अनेक ड्रेस असेही असतात जे कपाटात ठेवून ठेवून जीर्ण होतात. खराब होतात. असे कपडे कपाट ठेवणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्ठीकोणातून अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे. कारण यामुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. जर तुम्हाला काही प्रगतीच्या संधी मिळणार असतील तर त्यामुळे या संधी उपलब्ध होण्यास देखील विलंब होतो. त्यामुळे घरात कधीही फाटलेले कपडे ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बंद पडलेलं घड्याळ – आपण आधी हातामध्ये घाण्यासाठी एखादं घड्याळ वापरत असतो. किंवा भिंतीवरचं एखादं घड्याळ खराब होतं. अनेकांना अशी सवय असते की ते हे बंद पडलेली घड्याळं फेकून देत नाहीत तर ती कपाटात ठेवतात. मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घड्याळाला वेळ आणि गतीचं प्रतिक मानण्यात आलं आहे. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बंद पडलेलं घड्याळ हा तुमच्या प्रगतीमधील अडथळा ठरू शकतो.

फाटलेलं पाकीट किंवा पर्स- अनेक लोकांना अशी सवय असते की, ते फाटलेलं पाकीट किंवा पर्स फेकून न देता कपाटत ठेवतात. मात्र अशी पर्स किंवा पाकीट कपाटात ठेवणं हे वास्तुशास्त्रात अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घरात किंवा कपाटात कधीही फाटलेलं पाकीट किंवा पर्स ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

चपला -अनेकांना सवय असते की आपल्या नव्या चपला किंवा बूट ते कपाटात ठेवतात. मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे कपाटात कधीही चपला ठेवू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा