Wednesday Astro Tips | बुधवारी हे उपाय केल्याने बुध दोष होईल दूर, भगवान गणेशही प्रसन्न होतील

ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी, वाणी, तर्क क्षमता आणि मानसिक क्षमतेचा ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर त्याची कामे बिघडू लागतात. ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध दोष असेल तर काही विशेष उपाय केल्यान तुमच्या सर्व समस्या दूर होतात.

Wednesday Astro Tips | बुधवारी हे उपाय केल्याने बुध दोष होईल दूर, भगवान गणेशही प्रसन्न होतील
Lord Ganesha
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 11:32 AM

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेक लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे. मान्यता आहे की, बुधवारी गणपतीची पूजा केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी, वाणी, तर्क क्षमता आणि मानसिक क्षमतेचा ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर त्याची कामे बिघडू लागतात. ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध दोष असेल तर काही विशेष उपाय केल्यान तुमच्या सर्व समस्या दूर होतात. बुध दोष दूर करण्याच्या उपायांबद्दल जाणून घ्या –

? बुध ग्रहामुळे व्यक्तीचा सन्मान आणि आदर अनेक वेळा दुखावला जातो. जर एखाद्याला या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीने बुधवारी गणपतीची पूजा करावी आणि करंगळीमध्ये पन्ना धारण करावा. पन्ना घालण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचे मत घ्या.

? ज्योतिषांच्या मते, कुंडलीतील बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी प्रत्येक बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्या. हा उपाय कोणत्याही एका बुधवारी करायचा नाही, तर प्रत्येक बुधवारी नियमितपणे करावा. हे केल्याने गणेश जी देखील प्रसन्न होतात.

? बुध ग्रहाचे प्रतीक हिरवा रंग आहे. त्यामुळे बुधवारी हिरवे कपडे घातल्याने बुध ग्रहाचे दोषही दूर होऊ शकतात. याशिवाय, बुधवारी हिरव्या मूग धान्याचे किंवा हलव्याचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते.

? ज्योतिषांच्या मते, बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी, पर्समध्ये चांदी किंवा कांस्यचा गोल तुकडा ठेवा. असे केल्याने आर्थिक कमतरता भासणार नाही आणि सकारात्मकता राहील.

? बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी गणपतीची विधिपूर्वक पूजा करा. बुधवारी लाडू आणि 11 किंवा 21 दुर्वा अर्पण करणे शुभ आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी याप्रकारे पूजा करा

Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व